“पतंजली योगपीठामुळे हेल्थ टुरिझमला चालना, रोजगारही मिळतील”: योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:10 PM2022-05-05T16:10:35+5:302022-05-05T16:11:08+5:30
बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने सुरू केलेल्या अत्याधुनिक ‘वेदालाइफ निरामयम’ या केंद्राचे उद्घाटन योगी आदित्यनाथ यांनी केले.
डेहराडून: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथउत्तराखंडच्या दौऱ्यावर असून, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने सुरू केलेल्या अत्याधुनिक ‘वेदालाइफ निरामयम’ या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी बाबा रामदेव यांनी योगी आदित्यनाथ यांचे औक्षण केले. यावेळी बोलताना पतंजली योगपीठाच्या या केंद्रामुळे आरोग्य पर्यटनाला मिळेल. इतकेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होऊ शकेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनीही पतंजली वेदालाइफ निरामयमच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. दुर्गम भागातील स्थलांतर ही मोठी समस्या आहे. अशा अत्याधुनिक केंद्रांच्या स्थापनेमुळे औषधी पर्यटनाला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगारही मिळेल. योगी पुढे म्हणाले की, जुन्या काळात जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असायची तेव्हा ते या दुर्गम आणि निसर्गाने परिपूर्ण असलेल्या भागात जायला सांगितले जायचे, जेणेकरून शुद्ध वातावरणात वेळ घालवून तो बरा होऊ शकेल, असे योगी म्हणाले. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी आयुर्वेदिक औषधाला प्रोत्साहन दिल्याबद्दल बाबा रामदेव यांचे आभार मानले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. ते त्यांच्या मूळ गावी पाचूर येथे गेले, त्यांच्या आईला भेटले आणि रात्रभर आपल्या घरी राहिले. यासोबतच त्यांनी गावातील लोकांनाही भेटले, ज्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह योगी हरिद्वारमध्ये उत्तर प्रदेश सरकारने बांधलेल्या भागीरथी हॉटेलचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच अलकनंदा हॉटेलबाबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेला वादही संपुष्टात येईल, असे सांगितले जात आहे. हा वाद संपवण्यासाठी उत्तराखंड सरकारने अलकनंदा हॉटेलला लागून असलेली जागा उत्तर प्रदेश सरकारला देण्याचा निर्णय घेतला.