शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Coronavirus: “१ तासांत ऑक्सिजन संपणार इतक्यात...”; कोरोनाबाधिताने गर्भवती बहिणीसह इतर रुग्णांचे प्राण वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:27 PM

एकेदिवशी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपणार आहे अशी माहिती हॉस्पिटलच्या स्टाफने दिली. ऑक्सिजनचा साठा केवळ १ तासापुरता शिल्लक होता.

ठळक मुद्देकोविड पॉझिटिव्ह असूनही स्वत:च्या गर्भवती बहिणीसाठी आणि इतर रुग्णांसाठी तो रुग्णवाहिका चालवू लागला. पंकज आणि त्याची बहिण कोरोनाला मात देऊन घरी परतलेत त्यानंतर ही कहाणी सगळ्यांसमोर आली२३ एप्रिलला बहिणीची तब्येत बिघडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिला ऑक्सिजन लावावं लागेल असं सांगितले

गोरखपूर – एकीकडे कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा येणाऱ्या अनेक घटना वाचायला मिळतात तर दुसरीकडे माणुसकी जपणाऱ्याही घटना घडतात. गोरखपूरमध्ये संकटकाळात नाती कशी घट्ट असावीत याचं आदर्श उदाहरण समोर आलं आहे. याठिकाणी राहणारे पंकज शुक्ला आणि त्यांची गर्भवती बहिण दोघंही कोरोना संक्रमित होते. दोघांवर एकाच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

एकेदिवशी हॉस्पिटलमध्येऑक्सिजन संपणार आहे अशी माहिती हॉस्पिटलच्या स्टाफने दिली. ऑक्सिजनचा साठा केवळ १ तासापुरता शिल्लक होता. अशावेळी प्रत्येक जण आपापली व्यवस्था दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करत होतं. मात्र पंकज आणि त्याच्या बहिणीची सोय कुठेही झाली नाही. तेव्हा पंकजने स्वत: कमान हातात घेतली. कोविड पॉझिटिव्ह असूनही स्वत:च्या गर्भवती बहिणीसाठी आणि इतर रुग्णांसाठी तो रुग्णवाहिका चालवू लागला. अर्ध्या तासात त्याने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पुन्हा परतला. या काळात त्याने दुसऱ्याला संक्रमण पसरणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.

पंकज आणि त्याची बहिण कोरोनाला मात देऊन घरी परतलेत त्यानंतर ही कहाणी सगळ्यांसमोर आली. गोरखनाथ परिसरात राहणाऱ्या पंकज शुक्लाने सांगितले की, २० दिवसांपूर्वी मला ताप आला होता. तपासणी केली असता २१ एप्रिलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याचवेळी गर्भवती बहिणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. घरात पंकज एकटा कर्ता पुरुष होता. त्याने रुग्णवाहिका बोलावून बहिणीला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि दोघंही एकाच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.

ऑक्सिजनच्या कमीमुळे श्वास घेण्यास त्रास

२३ एप्रिलला बहिणीची तब्येत बिघडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिला ऑक्सिजन लावावं लागेल असं सांगितले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये केवळ १ तास ऑक्सिजन पुरेल एवढाच साठा असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे रुग्णांना इतरत्र जायाचं असेल तर जाऊ शकता असं  हॉस्पिटलने सांगितले. प्रशासनाने हे सांगताच मला धक्काच बसला. मी तातडीने हॉस्पिटल प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना खूप विनवणी केली. ऑक्सिजन मिळत नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही असं पंकजला सांगण्यात आलं.

गोरखपूरच्या ऑक्सिजन गॅस एजेन्सीशी संवाद साधला तर सिलेंडर घेऊन आला तर भरून मिळेल असं पंकजला सांगण्यात आलं. त्यानंतर ऑक्सिजन आणण्यासाठी कोण जाणार? असा प्रश्न उभा राहिला. कारण रुग्णवाहिकेचा चालक आधीच पळाला होता. त्यानंतर पंकजने कर्मचाऱ्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये ठेवलेले सिलेंडर रुग्णवाहिकेत ठेवले आणि स्वत: रुग्णवाहिका चालवून ऑक्सिजन नेण्यासाठी पोहचले.

बहिणीसोबत इतर रुग्णांचेही प्राण वाचवले

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याने अनेकांना समस्या उद्भवली. पंकजने वेळीच ऑक्सिजन सिलेंडर आणल्याने त्याच्या बहिणीसह दुसऱ्या रुग्णांचेही प्राण वाचले. हॉस्पिटलमधील १८ दिवस कसे गेले हे कधीच विसरणार नाही. प्रत्येक तासाला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज मला भीती घालत होता. मी तातडीने बहिणीकडे तिला पाहायला जात होतो.

कोरोनाशी लढून दोघं बहिण भाऊ घरी पोहचले

एका खासगी कंपनीत काम करणारा पंकज आणि त्याची गर्भवती बहिण दोघंही मंगळवारी सुखरूप घरी पोहचले. १४ दिवसानंतर त्या दोघांची चाचणी निगेटिव्ह आली. माझे वडिल या जगात नाहीत. त्यांच्या जाण्यानंतर माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. बहिणीची चिंता सतत सतावत होती असं पंकजने सांगितले.

गोरखपूर ट्रामा सेंटरचे संचालक डॉ. राजेश श्रीवास्तव म्हणाले की, सुरुवातीच्या काळात ऑक्सिजनची समस्या होती. रुग्णवाहिकेचा चालक आजारी होता. त्यामुळे त्याने रुग्णवाहिका चालवण्यास नकार दिला. तेव्हा पंकजने स्वत: रुग्णवाहिका चालवली. पंकज कोरोना संक्रमित होता. सुरक्षेची सर्व खबरदारी घेत पंकज ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहचला आणि त्याने ऑक्सिजन हॉस्पिटलला पोहचवला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल