उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती किती भयानक आहे हे एका धक्कादायक घटनेवरुन उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेशातील लहान लहान गावांवमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या प्रवाहात आता प्रेतं वाहून येत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी गावागावत प्रेतं थेट नदीच्या पात्रात सोडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे. (uttar pradesh dead bodies in yamuna river corona shocking details found)
माणसं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे
यमुना नदीच्या प्रवाहात शुक्रवारी अनेक प्रेतं वाहून आल्याचं दिसलं आणि एकच गहजब उडाला. या घटनेची तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्रेतांच्या घटनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हमीरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कळालं की गावागावांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांवर अंत्यसंस्कार करणं शक्य होत नसल्यानं प्रेतं नदीपात्रात सोडून दिली जात आहेत.
कुवेतची भारताला मोठी मदत! २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना, एकूण १४०० टन ऑक्सिजन भारतात येणार
हमीरपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक अनुपकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा एका ट्रॅक्टरमधून दोन शव आणण्यात आले होते आणि ते यमुनेच्या प्रवाहात टाकण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना आणखी काही मृतदेह नदी पात्रात सापडले आहेत.
स्थानिक लहान मुलांनी दिली धक्कादायक माहितीकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह नदीपात्रात सोडून देत जात असल्याच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही लहानमुलांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाचप्रकारे एका ट्रॅक्टरवर टाकून आणलं जातं आणि नदी पात्रात टाकलं जातं. हमीरपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या यमुना नदीचा उत्तर बाजूचा काठ कानपूर जिल्ह्यात देखील येतो आणि दक्षिण बाजूचा काठ हमीरपूर जिल्ह्यात येतो. म्हणजेच यमुना नदी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांची सीमारेषेसारखी आहे. यमुना नदीला दोन्ही जिल्ह्यांतील लोक मोक्षदायिनी कालिंदीच्या नावानं ओळतात आणि मृतदेह नदीच्या पात्रात सोडण्याची जुनी परंपरा असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे यमुनेच्या पात्रात एक-दोन शव दिसणं हे सामान्य मानलं जातं. पण कोरोना काळात नदीपात्रात वाहून येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आता लक्षणीयरित्या वाढला आहे. यावरुनच ग्रामीण भागात होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावता येऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये तर शेतीच्या जागांचंही स्मशानभूमीत रुपांतर झाल्याचंही सांगण्यात येतं. गावच्या स्मशानभूमीची जागा अपूरी पडू लागल्यामुळे शेतांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. धक्कादायक बाब अशी की या मृतांचा आकडा सरकारकडे देखील नाही आणि याची कुठे अधिकृत नोंद केलेली आढळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमधील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत जात आहे.