शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

Uttar Pradesh Election 2022: साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 3:48 PM

अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा सिनेमा ‘कागज’साऱखी कहानी रिअल लाइफमध्ये घडल्याचं अनुभवायला मिळत आहे. वाराणसी इथं गेली १८ वर्ष एक व्यक्ती स्वत: जिवंत असल्याचा पुरावा देत आहे. परंतु महसूल विभाग आजही या व्यक्तीला मृत मानत आहे. बनारसच्या छितौनीमधील हा प्रकार ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. साहेब, मी जिवंत आहे अशा शब्दात हा व्यक्ती प्रशासनासमोर पुरावा दाखवूनही हतबल झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बनारसच्या छितौनी जिल्ह्यात राहणाऱ्या संतोष मूरत सिंह यांचा महसूल विभागाच्या नोंदीनुसार २००३ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात मृत्यू झालेला आहे. परंतु संतोषचा दावा आहे की, नातेवाईकांनी बनावट कागदपत्रे दाखवत मृत्यू प्रमाणपत्र काढलं. आणि त्याआधारे १२ एकर जमीन स्वत:च्या नावावर करत आणि ती तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. त्यामुळे संतोष सिंह न्यायासाठी प्रशासनाकडं विनवणी करत आहे.

अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी गेल्या १७ वर्षापासून तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत त्याला यश मिळालं नाही. संतोष मूरत सिंह म्हणाला की, २०१२ राष्ट्रपती निवडणूक, २०१४, २०१९ मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. या निवडणुकीत त्याचा अर्ज बाद झाला. परंतु आजही तो जिवंत असल्याचं सिद्ध झालं नाही. २०१७ मध्ये त्याने शिवपूर विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवली परंतु त्याठिकाणी पराभव झाला.पुन्हा एकदा संतोष स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जन्मभूमी कानपूरमधून निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केला. पण तो रद्द करण्यात आला.

मुंबईला येत सुरु केले होते काम, परंतु...

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा सिनेमा २००० मध्ये छितौनी इथं आला होता. त्यानंतर संतोष त्यांच्यासोबतच मुंबईला गेले आणि तिथे आचारी बनले. २००३ मध्ये मुंबईत ट्रेन ब्लास्ट झाला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी संतोषविरोधात षडयंत्र रचत स्फोटात संतोष मारला गेला असं बनाव रचून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याची जमीन विकून टाकली. २००४ मध्ये संतोषला हे कळालं तेव्हापासून तो न्यायाची वाट पाहत आहे. परंतु अद्याप काहीच हाती लागलं नाही.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२