उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पैशांच्या लालसेपोटी भावाने बहिणीसोबतच लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित तरुणाने हे लग्न मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) केले होते. हा प्रकार समोर येताच अधिकारीही अवाक झाले आहेत. लग्न झालेल्या या जोडप्याचे व्हेरिफिकेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर उत्तर मागवण्यात आले आहे.
51 जोडप्यांचे लावण्यात आले होते लग्न -मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फिरोजाबादमधील टुंडला येथील आहे. टुंडला गटविकास कार्यालयात शनिवारी मुख्यमंत्री सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात नगरपालिका टुंडला, ब्लॉक टुंडला आणि ब्लॉक नरखी येथील 51 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व जोडप्यांना शासनाकडून घरगुती साहित्य व कपडे देण्यात आले.
असं उघडकीस आलं प्रकरण -या सामुहिक विवाह सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो परिसरातील लोकांपर्यंत आणि गावातील प्रमुखांपर्यंत पोहोचल्यानंतर, फसवणुकीची तब्बल चार प्रकरणे समोर आली. या चार प्रकरणांतील एका प्रकरणात एका भावाने बहिणीसोबतच लग्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौकशीनंतर, नगला प्रेम (घडी) येथे राहणाऱ्या भावाविरोधात समाज कल्याण विभागाचे सहायक विकास अधिकारी चंद्रभान सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.
अधिकाऱ्यांकडून मागवले उत्तर -यासंदर्भात बोलताना टूंडला येथील गट विकास अधिकारी (BDO) नरेश कुमार म्हणाले, लग्नासाठी जोडप्यांची यादी तयार करून त्यांचे व्हेरिफिकेशन करणाऱ्या ग्राम पंचायत सचिव मरसेना कुशलपाल, ग्राम पंचायत घिरोली सचिव अनुराग सिंह, एडीओ कॉपरेटिव सुधीर कुमार एडीओ समाज कल्याण विभाग चंद्रभान सिंह यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची उत्तरं समाधानकारक नसल्यास यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
महत्वाचे म्हणजे, संबंधित आरोपी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फसवणूक करणाऱ्या इतर जोडप्यांवरही कारवाई करण्याता आली आहे. दुसऱ्यांदा लग्ण करणाऱ्या अपात्र महिलेकडून देण्यात आलेले सामान जप्त करणअयात आले आहे. अद्याप चौकशी सुरू आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे टूंडलाचे प्रभारी राजेश कुमार पांडेय यांनी म्हटले आहे.