शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 6:25 PM

वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे.

Gyanvapi: वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात काल(दि.31 जानेवारी) कोर्टाने मोठा निर्णय दिला. मशिदीच्या व्यास तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, आज पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने व्यास तळघरातील पूजा-आरतीबाबत वेळापत्रकही जारी केले आहे. 

31 जानेवारी रोजी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी व्यास कुटुंबीय शैलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. यानंतर आज सूमारे तीस वर्षांनंतर व्यास तळघराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर लगेच तिथे पुजारींनी गौरी-गणेशाची पूजा केली. आता व्यास कुटुंब आणि काशी विश्वनाथ टेंपल ट्रस्ट तिथे नियमित पूजा करणार आहेत. या ठिकाणी पहिली आरती पहाटे 3.30 वाजता होईल, तर शेवटची शयन आरती रात्री 10 वाजता केली जाईल.

कोर्टाने काय दिला निर्णय?25 सप्टेंबर 2023 रोजी सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी व्यास तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराबाबत याचिका दाखल केली होती. तेव्हा त्यांनी कोर्टाकडे दोन मागण्या केल्या होत्या. व्यास तळघराचा हक्क त्यांना मिळावा ही त्यांची पहिली मागणी होती, तर दुसरी मागणी पूजेबाबत होती. पहिल्या मागणीवर जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी 17 जानेवारी रोजी निर्णय दिला आणि व्यास तळघराचा रिसीव्हर म्हणून वाराणसी डीएमची नियुक्ती केली. तसेच अंजुमन व्यवस्था मशीद समितीला तळघराच्या चाव्या डीएमला देण्यास सांगण्यात आले.

तळघराची चावी डीएमकडे असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा, डीएम एस. राजलिंगम आणि पोलिस आयुक्त अशोक मुथा जैन बुधवारी रात्री 10.30 वाजता ज्ञानवापी मशीद संकुलात पोहोचले. डीएमच्या देखरेखीखाली व्यासजींच्या तळघराचा दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर तिथे स्वच्छता व शुद्धीकरण करण्यात आले. शुद्धीकरणानंतर तळघरात कलश बसवण्यात आला. यानंतर 31 जानेवारी रोजी व्यास तळघरात पूजेसाठीही परवानगी देण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा व्यास तळघरात मूर्ती ठेवून पूजेला सुरुवात करण्यात आली. 

मुस्लिम पक्षाची याचिकादुसरीकडे, मुस्लिम पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंजुमन व्यवस्था समितीने लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली असून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मुस्लिम पक्षाने कोर्टाकडे 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. या आदेशाची 15 दिवस अंमलबजावणी करू नये, असे याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदUttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरMosqueमशिदCourtन्यायालय