ललितपूर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका स्थलांतरीत मजुराचा मृत्यू झाला. शवगृहात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता. मात्र उंदीर आणि किड्यांनी तो मृतदेह खाल्ला तसेच मृतदेह सडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित मजुराचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका मजुराला बिहारला आपल्या गावी जायचे होते. महाराष्ट्रातून प्रवास करून तो ललितपूर जिल्ह्यात पोहोचले होता. त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नसीमुद्दीन असं 58 वर्षीय मृत मजुराचं नाव होतं. या मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहामध्ये ठेवला.
मजुराची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना मृतदेह घेण्यास सांगितलं. मात्र नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. मृतदेह पूर्णपणे कुजला होता. शरीर किडे आणि उंदीराने खाल्लं होतं. मृताच्या कुटुंबियांनी आरोग्य विभागावर दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मजुराचे नातेवाईक असलेल्या परवेज आलम यांनी रुग्णालयात आपला संताप व्यक्त केला आहे आणि पुढे उच्च अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ
चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक
CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी