उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास वधू आणि वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळून आले होते. यानंतर घरात गोंधळ उडाला होता. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अथवा पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, या नवदाम्पत्याचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाल्याचे समोर आले आहे. यानंतर या नवदाम्पत्याला सोबतच एकाच चितेवर मुखाग्नि दिला गेला. जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडहिया नंबर चार गांवतील रहिवासी प्रताप यादवचे (23) 30 मे 2023 रोजी मंगल मेला गावात पुष्पा नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. प्रतापने 31 मे रोजी वधूला आनंदात आपल्या घरी आणले होते. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर या नव दाम्पत्यांचे मृतदेह बेडवर पाहिल्यानंतर घरातील सर्वानाच धक्का बसला होता.
पोलीस अधीक्षकांनी सांगितलं हार्ट अॅटॅकने झाला मृत्यू -याता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर, दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाल्याचे म्हटले आहे. प्रताप आणि पुष्पा यांना काल गोडहिया गावात एकाच चितेवर मुखाग्नी देण्यात आला.