वाराणसीतील बडागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत्या कारमध्ये कोब्रा साप निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील व्यास बागमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर, काही लोक साप-साप म्हणत गाडीतून बाहेर पडले. यामुळे, ग्रामस्तांनी महामार्गावर मोठी गर्दी केली होती. यानंतर अथक प्रयत्न करून लोकांनी हा साप गाडीतील बाहेर काढला.
यासंदर्भात माहिती देताना गाजीपूर येथील एसके श्रीवास्तव म्हणाले, की ते बुधवारी आपली पत्नी आणि मुलांसह मिर्झापूर येथून अॅम्बेसॅडर कारने गाझीपूर येतील आपल्या घरी जत होते. यावेळी कार ड्रायव्हर मुख्तार अहमद हे कार चलवत होता. रिंग रोड फेज दोन वरून कार एनएच 56 वर पोहोचली, याच वेळी व्यास बाग येथे गियर बॉक्स जवळच्या रिकाम्या जागेत कोब्राने तोंड वर काढले. ड्राइव्हर जवळील सीटवर बसलेल्या एसके श्रीवास्तव यांच्या मुलाची नजर त्याच्यावर पडली. तो म्हणाला, कारमध्ये उंदीर आहे. यानंतर ड्रायव्हची नजर जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा तो सुन्न झाला.
दरम्यान, मागे बसलेल्या एसके श्रीवास्तव आणि त्यांच्या पत्नीनेही हा कोब्रा बघितला. यानंतर ड्रायव्हरने तत्काळ कार थांबवली आणि कारमधील सर्व जण आरडाओरड करत कारमधून बाहेर पडले. या लोकांना आरडाओरड करत कारबाहेर पडताना पाहून जवळपासचे दुकानदारही कार जवळ जमा झाले. यानंतर या लोकांनी कारमध्ये असलेले सर्व सामान बाहेर काढले आणि यानंतर ते कारमध्ये साप शोधू लागले.
जवळपास अर्ध्यातासानंतर या सापाला कारमधून बाहेर काढण्यात लोकांना यश आले. यानंतर, तेथे लाठ्या-काठ्या घेऊन उभ्या असलेल्या लोकांनी सापला मारून टाकले. यानंतर कारमधील सर्व लोक कारमध्ये बसून गाझीपूरकडे निघून गेले. एसके श्रीवास्तव हे मिर्झापूर येथील विशेष न्यायाधीशांचे पीए आहेत.