उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:00 AM2019-05-23T08:00:21+5:302019-05-23T08:02:58+5:30

Uttar Prades(UP) Lok Sabha Election Results Live Vote Counting: उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

Uttar Pradesh Lok Sabha Election 2019 Results: Who will win in Uttar Pradesh? BJP or Magathbandhan | उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?

उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?

Next

लखनौ - दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भाजपाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली आहे. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

उत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश नेमका कुणाला साथ देतोय हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र येथे महाआघाडीने भाजपाला मात दिल्यास लोकसभेत बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागू शकतो.

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2019 Results: Who will win in Uttar Pradesh? BJP or Magathbandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.