Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 : उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकाल; इंडिया आघाडीने घेतली आघाडी, आकडेवारी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:06 AM2024-06-04T10:06:44+5:302024-06-04T10:07:18+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या फेरीमध्ये फेरीमध्ये इंडिया आघाडीने आघाडी घेतली असून भाजपा पिछाडीवर आहे. इंडिया आघाडी ३७ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपाने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यूपीमध्ये एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला सपा आणि काँग्रेसची इंडिया आघाडी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने गेल्या दोन निवडणुकांमध्ये यूपीमध्ये जास्त जागांवर विजय मिळवला आहे. यावेळीही एनडीए उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत ७० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. मात्र, दुसरीकडे इंडिया आघाडीनेही विजयाचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल समोर येत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेसचे अजय राज आघाडीवर आहेत. अजय राय यांना आतापर्यंत ११,४८० मते मिळाली आहेत.
राहुल गांधी आघाडीवर
काँग्रेसचे राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २१२६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी ३९५ मतांनी पिछाडीवर आहेत. सहारनपूरमधून काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद १०,१६३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सीतापूरमधून काँग्रेसचे राकेश राठोड ४३३१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराबंकीमधून काँग्रेसचे तनुज पुनिया १०९७ मतांनी आघाडीवर आहेत.