सुल्तानपूर- लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयक संमत झालं आहे, राज्यसभेट ते रखडलं आहे आणि लकरच त्यावर कायदा होणार अशी आशा आहे. पण तिहेरी तलाकविरोधातील माहिती देशाच्या बाहेर काम करणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहचली नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला फोनवर एसएमएसकरून तिहेरी तलाक दिला. 'एएनआय'च्या वृत्तानुसार तिहेरी तलाक देणारी व्यक्ती उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरच्या नंदौलीची रहाणारी आहे. 'सासरची मंडळी हुंड्यामध्ये एक कारची मागणी करून त्रास देत आहेत. नवरासुद्धा योग्य वागणूक देत नव्हता. मला पतीने एसएमएसकरून तिहेरी तलाक दिला. माझा एक मुलगा असून त्याच्याबरोबर मला अख्खं आयुष्य काढायचं आहे. सासर हेच माझं घर असून मी इथून कुठेही जाणार नाही', असं पीडित महिलेने म्हंटंल.
पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीच्या लग्नानंतर दोन वर्ष सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण नंतर सासरचे तिला त्रास द्यायला लागले. त्यांनी तिला नंतर घराबाहेर काढलं. त्यानंतर एके दिवशी तिच्या पतीने तिला एसएमएसकरून तिहेरी तलाक दिला. सोशल मीडियावर युजर्स या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत असून अप्रत्यपणे काँग्रेसवर टीका केली जाते आहे. 'अशा लोकांच्या(तिहेरी तलाक देणाऱ्यांच्या) मदतीला काँग्रेस उभी आहे, असं एका युजरने म्हंटलं आहे. 'राहुल गांधी लवकरच संपूर्ण देशाला अमेठी करतील', असं एका युजरने म्हंटलं आहे.