मोठी बातमी: उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून प्रियांका गांधी असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? योगींना देणार थेट टक्कर
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 13, 2021 09:07 PM2021-02-13T21:07:34+5:302021-02-13T21:12:28+5:30
उत्तर प्रदेश काँग्रेसच्या शेतकरी रॅलीत सहभाग घेण्याबरोबर त्या पक्षाला 'राजकीय भोवऱ्यातून' बाहेर काढण्यासाठी प्रयागराजच्या संगमापर्यंतही पोहोचल्या. तेथे तीन डुबक्या मारून त्यांनी काँग्रेसची नाव तिराला लावण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे.
लखनौ -काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) सध्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसला संजिवनी देण्याच्या महाअभियानात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रियांका गांधी स्वतःच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यावेळी त्या योगी आदित्यनाथांना थेट टक्कर देतील. (Uttar Pradesh mission 2022 Priyanka Gandhi will be cm face from Congress)
उत्तर प्रदेश काँग्रेसच्या शेतकरी रॅलीत सहभाग घेण्याबरोबर त्या पक्षाला 'राजकीय भोवऱ्यातून' बाहेर काढण्यासाठी प्रयागराजच्या संगमापर्यंतही पोहोचल्या. तेथे तीन डुबक्या मारून त्यांनी काँग्रेसची नाव तिराला लावण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे.
प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना
जागरण डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गांधी वाड्रा यांना काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याचे ठरविले आहे. प्रियांका यांनी राज्याच्या प्रभारी पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे तसेच त्या सरकारशी सात्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत, की प्रियांका गांधी वाड्रा या विधानसभा निवडणूक 2022 मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यासंदर्बात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी आणि सामान्य नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याची प्रियांका यांची इच्छा आहे. संगमात स्वतःच नावेची धुरा सांभाळणे आणि काही दिवसांपूर्वी रामपूरच्या रस्त्यावर स्वतःच गाडीचा आरसा पुसणे याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार
2019 पासूनच उत्तर प्रदेशात सक्रिय -
प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेशात प्रचंड सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. त्या उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाला धार देण्याचे कामही करत आहेत. एवढेच नाही, तर त्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेत असल्याचेही दिसत आहेत. खरेतर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्यापासून म्हणजे 2019 पासूनच त्या उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. आता त्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत. पुढील काळात त्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या जुन्या समर्थकांनाही भेटणार असल्याचे समजते.