मुरादाबाद - विधानसभा निवडणुकीच्या माध्यमाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात एआयएमआयएमसाठी जमीन तयार करत असलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना मुरादाबादमध्ये अडचणीचा सामना करावा लागला. ओवेसी निवडणूक प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी येथे येणार होते, मात्र, त्यांना माझौला येथील ड्राइव्ह इन 24 हॉटेलमध्ये एकही रूम मिळाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजमेंटने ओवेसी यांना रूम देण्यास नकार दिला. यावरून AIMIM च्या प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच बरोबोर, त्यांनी आरोप केला की, ‘हॉटेल मॅनेजमेंटने आपल्यालासांगितले, की पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी यांना रूम देऊ नये, असे सांगितले. तसेच, होटलमध्ये इतर कुण्या व्यक्तीसाठी रूम उपलब्ध आहे. पण, ते ओवेसी यांना रूम देऊ शकत नाहीत, असेही हॉटेल व्यवस्थापनाने सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरातमधील साबरमती तुरुंगात असलेला बाहुबली अतिक अहमदचा मुलगा अली अहमदसोबतची प्रस्तावित जाहीर सभा स्थगित केली होती. ही सभा ९ जानेवारीला प्रयागराजमध्ये होणार होती. पण याच दरम्यान अली अहमदवर गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर ओवेसी यांनी ही घोषणा केली.