कानपूर-उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये अत्तर व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. जैनला कर चुकवेगिरी आरोपाखाली सीजीएसटी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. जैनला आज न्यायालयात हजर केले जाऊ शखते. त्याच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत तब्बल 357 कोटींची रक्कम आणि दागदागिने जप्त करण्यात आले आहेत. ही रेड पाहून तुम्हाला अजय देवगणचा 'रेड' सिनेमा आठवल्याशिवाय राहणार नाही.
काउंटिंग मशीनने मोजले पैसेजीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशनालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाच्या पथकाने अत्तर व्यापारी पियुष जैन याच्या कानपूर येथील घरावर छापा मारला होता. यात जैन यांच्या कपाटात इतकी रक्कम सापडली होती की ती मोजण्यासाठी काउंटिंग मशीन मागवाव्या लागल्या होत्या. एकूण 8-10 मशीनचा वापर करुन पैसे मोजले जात होते.
आतापर्यंतची सर्वात मोठी रेडकेंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) इतिहासातील ही सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा आकडा आणखी वाढू शकतो. जैनच्या तळघरातही पैसा दडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी आता जीएसटी टीमने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या टीमला तपास आणि उत्खनन करण्यासाठी बोलावले आहे.
ASIची टीम करणार तपासमिळालेल्या माहतीनुसार, छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना काँक्रीटच्या भिंतीसह उभी असलेली प्लायच्या भिंतीमध्ये नोटांचा मोठा साठा सापडला आहे. यासोबतच बोगद्यासारख्या आकारांच्या अलमाऱ्यांमध्येही नोटांची बंडले सापडली आहेत. यामुळे जैनने घरात बऱ्याच ठिकाणी पैसे लपल्याचा संशय बळावला आहे. तळघर आणि भितींमध्ये पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू लपवल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या टीमकडून भिंती, फरशी, तळघर आणि बोगद्याच्या आकाराच्या कपाटांचे मोजमाप केले जात.
जैनच्या नावे अनेक कंपन्याजैनच्या नावावर सुमारे 40 कंपन्या आहेत. त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेल्या कपाटांमध्ये 500 आणि 20001 रुपयांची बंडले होती. जैनचे मुख्यालय मुंबईत असून, कनौज आणि कानपूर येथे कार्यालये आहेत. तेथेही छापे मारण्यात आले. जीएसटी इंटेलिजन्सने प्रथम छापे टाकले. तिथे आढळलेली रोख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आले. जप्त रक्कम कंटेनरमधून आरबीआयमध्ये(RBI) नेली.