लखनऊ: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात दररोज कोरोनाचे अडीच लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. अनेक रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत राहावं लागत आहे. रुग्णालयात बेड मिळण्यासाठी कित्येक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मरणानंतरही अनेकांचे हाल संपलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह तीन दिवस घरातच पडून होता. दुर्गंध येऊ लागल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.कोरोनाचे संक्रमण टाळायचे असेल तर घरीदेखील मास्क वापरा! वाचा डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणतात...शेजाऱ्यांनी संपर्क साधताच पोलीस पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं वृद्धेचा मृतदेह घराबाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भरत नगरमध्ये सविता नावाची एक वृद्ध महिला एकटी राहायची. या महिलेनं गावातल्या तिघांना एक घर भाड्यानं दिलं होतं. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी भाडेकरू गावी गेल्यानं महिला तिच्या घरात एकटीच वास्तव्यास होती. त्यामुळेच तिच्या मृत्यूची माहिती कोणालाही समजली नसावी.कोविशिल्ड लसीच्या डोसचे नवे दर ठरले; रुग्णालयांना 150 ते 600 रुपयांत मिळणारकोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून मिळाल्याचं सामाजिक कार्यकर्ते इमदाद यांनी सांगितलं. एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्या घरात जमिनीवर पडून आहे. मृतदेहाचा हात कुत्र्यांनी खाल्ला आहे, अशी माहिती फोनवरून मिळाल्यानंतर इमदाद घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका न मिळाल्यानं वृद्धेचा मृतदेह एका खासगी वाहनातून न्यावा लागला.कोरोनामुळे महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून पडून होता, याची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं ही बाब समोर आली. शेजारचे लोक महिलेच्या घरी पोहोचले, तेव्हा तिच्या मृतदेहाजवळ काही कुत्रे आढळून आले. त्यांनी महिलेचा एक हात खाल्ला होता. हे दृश्य पाहून अनेकांना भीती वाटली. आपल्याला ताप असल्याचं या महिलेनं काही दिवसांपूर्वीच शेजाऱ्यांना सांगितलं होतं. सध्या पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
CoronaVirus News: तीन दिवसांपासून घरात पडून होता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह; शेजारी पोहोचताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 7:57 AM