वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे सोमवारी काशी कॉरिडॉरचे उद्घाटन केले. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेतला. यानंतर त्यांनी क्रूझ राईड केली. नंतर ते अस्सी घाट आणि संत रविदास घाटावर पोहोचले. येथे त्यांनी संत रविदासांना नमन केले. एवढेच नाही, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पीएम मोदी रात्री उशिरा वाराणसी स्टेशनवर पोहोचले. पीएम मोदींनी वाराणसी स्टेशनचे काही फोटोही शेअर केले आहेत.
पीएम मोदींनी ट्विट करत लिहिले आहे, पुढचा थांबा...वाराणसी स्टेशन. आम्ही रेल्वेचे जाळे वाढवण्यासोबतच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवाशांना अनुकूल असेल, अशी रेल्वे स्थानके बनविण्यासाठी काम करत आहोत.
काशीतील विकास कामांचा घेतला आढावा -तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी काशीमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. काशीतील मोठ्या विकासकामांची पाहणी करत असल्याचे ट्विट त्यांनी केले. या पवित्र शहरासाठी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींची गंगा आरतीला हजेरी -काशीतील गंगा आरतीने नेहमीच नवीन उर्जा मिळते. आज काशीतील मोठे स्वप्न पूर्ण करून दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीसाठी उपस्थित होतो आणि माता गंगेला तिच्या कृपेसाठी नमन केले.