मेरठ: एन्काऊंटरवेळी बंदूक पडल्यावर तोंडानं फायरिंगचा आवाज काढणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीस दलातील उपनिरीक्षकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला होता. गुन्हेगाराला इशारा देण्यासाठी तोंडातून 'ठाय ठाय' आवाज काढणाऱ्या उपनिरीक्षकांना आता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. एन्काऊंटरवेळी उपनिरीक्षक मनोज यांनी बंदूक बंद पडताच प्रसंगावधान राखल्याचं उत्तर प्रदेशपोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केलं जाणार आहे. त्यासाठी त्यांचं नाव डीजीपींकडे पाठवलं जाईल. उपनिरीक्षक मनोज कुमार यांच्या सहकाऱ्यांनीदेखील त्यांच्या साहसाचं कौतुक केलं आहे. 'माझे सहकारी उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं. उपनिरीक्षकांचं बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तोंडातून ठाय-ठाय असा आवाज काढला,' असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं.
एन्काऊंटरवेळी तोंडातून बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:47 AM