मुरादाबाद: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच खडाजंगी झाली आहे. नर्स आणि डॉक्टर यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, पंखे से लगता है! रुग्णाचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरलरामपूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. नर्सनं डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. डॉक्टरांनीदेखील नर्सला मारहाण केली. यामुळे बराच गोंधळ झाला. पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांची समजूत काढून त्यांना शांत केलं. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
VIDEO: आहे तुझी औकात..? नर्स भडकली, डॉक्टराच्या कानशिलात लगावली; रुग्णालयात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 9:47 AM