शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

उत्तर प्रदेशात त्रिकोणी लढती

By admin | Published: January 05, 2017 2:59 AM

निवडणूक आयोगाने बुधवारी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्तरप्रदेशातही ती सात टप्प्यांत होणार आहेत

सुरेश भटेवरा , नवी दिल्लीनिवडणूक आयोगाने बुधवारी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्तरप्रदेशातही ती सात टप्प्यांत होणार आहेत. या राज्यात त्रिकोणी स्पर्धा रंगणार असून, समाजवादी व बहुजन समाज पक्ष आपल्या विजयाच्या परंपरेची पुनरावृत्ती करण्यासाठी झटत आहेत तर भाजपनेही १४ वर्षांच्या वनवासानंतर राज्याची सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट पडली असून, पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकल आपल्या गटाला मिळावे यासाठी मुलायमसिंग व अखिलेश या दोन्ही गटांचे निवडणूक आयोगापुढे भांडण सुरू आहे. अशा वातावरणात हा पक्ष यशाची पुनरावृत्ती करू शकेल काय, हा मोठा प्रश्न आहे.काय आहे चारही पक्षांची राज्यामधील सध्याची स्थितीभाजपाने गेल्या १४ वर्षांपासून उत्तरप्रदेशात सत्तेतून बाहेर आहे. गेल्या २ विधानसभा निवडणुकीतही पक्षाला फारसे यश मिळवता आलेले नाही. भाजपची सर्वात मोठी कमजोरी अशी की मायावती आणि अखिलेश यादव यांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीसाठी विश्वासार्ह व आश्वासक चेहरा नाही. नुक त्याच झालेल्या सर्वेक्षणात भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारांना जनतेने तिसऱ्या अथवा चौथया पसंतीवर ठेवले आहे. भाजपनेउमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत ८0 पैकी ७१ जागा जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास अधिक आहे. पंतप्रधानांच्या सभांनी निवडणुकीत रंग भरू लागला आहे. पंतप्रधान मोदी हेच इथे भाजपाचे स्टार असतील.मायावतींनी २00७ साली उत्तरप्रदेशात ४0३ पैकी २0६ जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन केले. सलग ५ वर्षांचा कारभार सुरळीतपणे चालवून दाखवला. सध्या बसपा प्रमुख विरोधी पक्ष आहे. यंदा दलित आणि मुस्लीम मतदारांच्या सोशल इंजिनिअरिंगवर मायावतींची सर्वाधिक भिस्त आहे. २0१२ साली मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाकडे गेल्यामुळे बहनजींना ८0 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतही दलितांच्या एकगठ्ठा मतांची साथ मायावतींनाच मिळाली. मात्र मुस्लीम मतदारांनी त्यावेळीही बसपकडे पाठ फिरवल्यामुळे कोट्यवधी मते मिळवूनही बसपला राज्यात एकही जागा मिळवता आली नाही. सांप्रदायिक शक्तींशी लढण्याचे बळ मायावतींकडे आहे. समाजवादी पक्षात कलह वाढल्यामुळे मुस्लीम मतदार यंदा मायावतींना साथ देतात काय? हा या कळीचा मुद्दा आहे.काँग्रेसची मात्र उत्तरप्रदेशात दुर्दशा आहे. विधानसभा निवडणुकीत २00७ मधे २२ आणि २0१२ मधे २८ जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. यंदा किसान संघर्ष यात्रेचे आयोजन करून, गावोगावी खाटसभांच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचारमोहिमेत आघाडी मिळवली. रिटा बहुगुणांना हटवून राज बब्बर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजाराम पाल, राजेश मिश्रा, भगवती प्रसाद व इमरान मसूद यांना उपाध्यक्ष बनवून अनुक्रमे ओबीसी, ब्राह्मण, दलित, मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न झाले. राज्यात विजय मिळवून देण्याची जबाबदारी रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यावर सोपवली आहे. दिल्लीत १५ वर्षे कारभार करणाऱ्या शीला दीक्षितांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. तथापि हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हा राष्ट्रीय पक्ष अखिलेश यादव यांच्या गटाबरोबर आघाडी करून निवडणूक लढवण्याच्या प्रतिक्षेत आहे. बिहारप्रमाणेच आपल्या जागा वाढवून सत्तेत भागीदारी करण्याची स्वप्ने पाहत आहे.