लखनौ - उत्तर प्रदेशात महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पाहायला मिळालं. भररस्त्यात एक तरुणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर आता परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक पुष्पांजली यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत, घडल्या प्रकाराची माहिती घेतली. यानंतर तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन पेट्रोलचे पिंप, मुलीची सायकल आणि काडेपेटींचं बंडल ताब्यात घेण्यात आहे. दरम्यान, पोस्टमार्टेम अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
भाजी विकत आणण्यासाठी गेली होती तरुणीही घटना उन्नावमधील बारासगरवर पोलीस स्टेशन परिसरात घडला आहे. मृत पावलेली तरुणी ही सथनी बाला खेडा गावातील रहिवासी होती. गुरुवारी (22 फेब्रुवारी) संध्याकाळी भाजी विकत आणण्यासाठी ती सायकलवरुन घराबाहेर पडली. यावेळी काही अज्ञातांनी तिच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि तिला जिवंत जाळून तिथून पळ काढला. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनीदेखील यावर बोलण्यास नकार दिलेला आहे.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखालतरुणीला जिवंत जाळण्यात आल्याचे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतले आहे. पोलीस स्टेशनमध्ये काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचेही काम पोलीस करत आहेत.