Gangster reached Police Station with Poster:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात गुन्हेगारांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबली आहे. वेळोवेळी याचे प्रात्यक्षिकही पाहायला मिळते. त्यांच्या या पॉलिसीमुळे राज्यातील मोठ्यातले मोठे गुंड घाबरुन गेले आहेत. अनेक गुन्हेगारांना पोलीस पकडत आहे, तर काहीजण स्वतःहून सरेंडर करत आहेत.
दरम्यान, यूपीच्या संभल जिल्ह्यात पोलिसांच्या भीतीमुळे गँगस्टर अॅक्टचा आरोपी आणि कुख्यात गाय तस्कर जाबुलने पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. जाबुल हातात पोस्टर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्या पोस्टवर लिहिले होते, 'सर, माझ्यावर गँगस्टर कायद्याचा आरोप आहे, मला अटक करा, पण मला गोळी मारू नका.' आत्मसमर्पण केलेल्या गाय तस्कराला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
जाबुलला पाहून पोलीसही चकित झालेउत्तर प्रदेशातील गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई दिसून येत आहे. संभलच्या हयात नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गाय तस्कर आणि गुंड जाबूल पोलीस कारवाईच्या भीतीने आत्मसमर्पण करण्यासाठी हातात पोस्टर घेऊन हयात नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. जाबुल स्वत: पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याचे पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
गुन्हेगारी घटनांपासून दूर राहणार...
पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर जाबुलने हात जोडून स्टेशन प्रभारी कर्मसिंह पाल यांच्याकडे प्रार्थना केली आणि सांगितले की सर, आता मी गुन्हेगारी घटनांपासून दूर राहीन. यासोबतच त्यांनी माफीही मागितली. आरोपीला आता न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले.