शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

योगी सरकारची कमाल! 'आधार कार्ड'च्या सहाय्यानं वाचवले ८००० कोटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 4:04 PM

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं आधार कार्डच्या मदतीनं ८००० कोटींहून अधिक रुपयांची बचत केली आहे.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं आधार कार्डच्या मदतीनं ८००० कोटींहून अधिक रुपयांची बचत केली आहे.  अहवालानुसार 'आधार'च्या मदतीनं गेल्या नऊ वर्षांत उत्तर प्रदेश सरकारनं ७९ लाख बनावट लाभार्थी पकडले आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) १२ अंकी आधार क्रमांक जारी करतं. आधार कार्ड भारतात राहणाऱ्या लोकांसाठी ओळख आणि घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतं. त्याचा उपयोग विविध सरकारी विभागांकडून थेट लाभ योजनेसाठी (DBT) केला जातो.

UIDAI फेस ऑथेंटिकेशन किंवा थंप प्रिंट आणि रेटिना स्कॅन यांसारख्या बायोमेट्रिक्सच्या मदतीनं लाभार्थी ओळखण्यात मदत होते. अहवालानुसार, उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की सरकारनं आधारच्या मदतीने ७९,०८,६८२ बनावट लाभार्थ्यांना यादीतून वगळलं आहे. यातून एकूण ८,०६२.०४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

बहुतांश बनावट लाभार्थी अन्न व नागरी पुरवठा विभागानं वगळले आहेत. या विभागानं एकूण ५५.५१ लाख बनावट लाभार्थींना यादीतून काढून टाकलं असून यातून ७,०६५.१० कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याच वेळी, मूलभूत शिक्षण विभागानं १७.३१ लाख बनावट लाभार्थी शोधून काढले आहेत. ज्यामुळे सुमारे १७४.९५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

महिला कल्याण विभागाने केली १६३ कोटींची बचतसमाजकल्याण विभागाने २.९२ लाख बनावट लाभार्थी पकडले असून त्यातून २९६.३८ कोटी रुपयांची बचत केली आहे. तर, महिला कल्याण विभागाने २.७ लाख बनावट लाभार्थींना यादीतून वगळल्याने १६३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. अहवालानुसार, UIDAI च्या लखनौ कार्यालयातून माहिती मिळाली आहे. यानुसार २९ सप्टेंबर २०१० रोजी आधार लागू झाल्यापासून उत्तर प्रदेशातील २२.४ कोटी लोकांनी बायोमेट्रिक आयडी प्रणालीमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. 

अहवालानुसार, DBT मध्ये आधार बनावट आणि डुप्लिकेट लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये आधार आधारित प्रमाणीकरणाची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये आरडी उपकरणांवर बोटांच्या ठशांची मदत घेण्यात आली आहे. केवळ योग्य लाभार्थींचे प्रमाणीकरण केले जाईल आणि केवळ त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील, असं UIDAI उपमहासंचालक लेफ्टनंट कर्नल प्रशांत कुमार सिंह म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAdhar Cardआधार कार्ड