शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

उत्तर प्रदेशातील आठ मंत्र्यांना डच्चू

By admin | Published: October 29, 2015 10:21 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी एक मोठा निर्णय घेत आपल्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू दिला असून नऊ मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी एक मोठा निर्णय घेत आपल्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू दिला असून नऊ मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. यादवांनी दिवाळीपूर्वी केलेल्या या राजकीय धमाक्याने अनेकांना धक्के बसले आहेत.राज्याचे राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून पाच कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांना पदमुक्त केले आहे. फेरबदलानंतर नव्या मंत्र्यांना ३१ आॅक्टोबरला राजभवनात आयोजित कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल.हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांच्या विभागांची जबाबदारी तूर्तास मुख्यमंत्री स्वत: सांभाळतील,अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. याशिवाय ज्या नऊ मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली आहेत त्यांच्याही विभागाचे कामकाज अतिरिक्त कारभाराच्या रूपात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपविले आहे. हे मंत्री बिनखात्याचे पदावर राहतील. अखिलेश यादव यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात बुधवारी रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. फेरबदलात मुख्यमंत्री काही मंत्र्यांची हकालपट्टी करतील,असे मानले जात आहे. यादव यांनी दोन दिवसांपूर्वीच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात जास्तीतजास्त ६० मंत्री राहू शकतात. ताज्या घटनाक्रमात आठ मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आल्यानंतर मंत्रिमंडळात रिक्त पदांची संख्या वाढून १४ झाली आहे. (वृत्तसंस्था) आरोग्यमंत्री अहमद हसन, उद्योग व खाद्य प्रक्रिया मंत्री पारसनाथ यादव, प्राथमिक शिक्षण मंत्री रामगोविंद चौधरी, वादग्रस्त अन्न व पुरवठा मंत्री रघुराजप्रताप सिंग ऊर्फ राजाभय्या, माध्यमिक शिक्षण मंत्री महबूब अली, समाजकल्याण मंत्री अवधेश प्रसाद, परिवहन मंत्री दुर्गाप्रसाद यादव, होमगार्डस् मंत्री ब्रह्माशंकर त्रिपाठी आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री इकबाल महमूद.कॅबिनेट मंत्री- राजा महेंद्र अरिदमन सिंग (स्टॅम्प व न्यायालय शुल्क,नोंदणी आणि नागरी सुरक्षा), अंबिका चौधरी (मागासवर्गीय आणि विकलांग कल्याण), शिवकुमार बेरिया (वस्त्र आणि रेशीम उद्योग), नारद राय (खादी व ग्रामोद्योग), शिवकांत ओझा (तंत्र शिक्षण)राज्यमंत्री-आलोककुमार शाक्य (तंत्रशिक्षण), योगेशप्रताप सिंग ऊर्फ योगेश भय्या (प्राथमिक शिक्षण),भगवत शरण गंगवार (सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग व निर्यात प्रोत्साहन,स्वतंत्र कारभार)