शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

उत्तर प्रदेशात प्रचारावर ५,५०० कोटींची खैरात!

By admin | Published: March 18, 2017 1:48 AM

नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार मोहिमेवर वेगवेगळ््या पक्षांनी एकूण तब्बल ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

नवी दिल्ली : नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार मोहिमेवर वेगवेगळ््या पक्षांनी एकूण तब्बल ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील एक हजार कोटी रुपये नोट फॉर व्होट (मतांची खरेदी) साठी खर्च करण्यात आले. होते. जवळपास एक तृतीयांश मतदारांनीही आम्ही मतांसाठी पैसे व दारू घेतल्याचे मान्य केले आहे.एकट्या उत्तर प्रदेशमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ५,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. सीएमएस कंपनीने निवडणूक व्हायच्या आणि निवडणुकीनंतर केलेल्या अभ्यासाद्वारे शुक्रवारी वरील खर्चाचा दावा केला.निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला २५ लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली होती. परंतु प्रत्येक उमेदवाराने या मर्यादेपेक्षा किती तरी जास्त आणि निवडणुकीनंतर जे घोषित केले त्यापेक्षा जास्त पैसा खर्च केला हे उघड गुपित आहे. प्रचारासाठी पारंपरिक आणि अपारंपरिक मार्गांचा वापर केला गेला. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम, व्हिडिओ व्हॅन्स, स्क्रीन प्रोजेक्शन्स आदींवर ६०० ते ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशात पडलेल्या प्रत्येक मताचा खर्च साधारण ७५० रुपये होता आणि देशात हा सगळ््यात जास्त खर्च ठरला, असे पाहणीतून समोर आले.या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये २०० आणि आणि पंजाबमध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे अधिकाऱ्यांनी जप्त केले, असे या अभ्यासात म्हटले. जे पैसे जप्त करण्यात आले, त्यापेक्षा ४-५ पट पैसा प्रचारात फिरत होता. एका अंदाजानुसार २०१७ च्या निवडणुकीत मतदारांमध्ये अंदाजे एक हजार कोटी रुपये वाटले गेले. उत्तर प्रदेशात झालेल्या या पाहणीमध्ये ५५ टक्के मतदारांना त्यांच्या शेजारच्या किंवा परिचयाच्या लोकांनी या निवडणुकीत वा याआधीच्या निवडणुकांतही पैसे घेतले होते आणि त्यांनीच ते आम्हाला सांगितले, असे मान्य केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारोदार जाऊन, मेळावे, यात्रा, समाजमाध्यमे, दूरचित्रवाणीवरील व वृत्तपत्रांतील जाहिराती, मल्टी स्क्रीन प्रोजेक्शन्स, मोटारसायकल मेळावे, लंगर आणि प्रसिद्ध व्यक्तींचे कार्यक्रमांद्वारे प्रचार केला गेला.नोटाबंदीनंतर वाढला प्रचार खर्चनोटाबंदीच्या निर्णयाने प्रचाराचा खर्च लक्षणीयरीत्या वाढवला असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ज्या मतदार संघात निवडणूक अतिशय चुरशीची होती, तेथे मतदारांच्या संख्येवर, तसेच मतदारांचा प्रभाव किती, यावर ५०० ते २००० हजार रुपये ठरत होते, असे हा अभ्यास म्हणतो. दोन तृतीयांश मतदारांना उमेदवारांनी यापूर्वी खर्चले नसतील, एवढे पैसे खर्च केल्याचे आढळले.