मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेची प्रसूती होताच वडिलांनी मुलाला विकल्याची संतापजनक घटना घडली आहे. मेडिकल कॉलेजमधील मूल चोरीला गेल्याच्या आरोपानंतर आरोपी बापाचे गुपित उघड झाले. आरोपी वडिलांकडून 82,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. माहितीनुसार, प्रसूती होण्याच्या आधीच ही डील करण्यात आली होती. महिलेची प्रसूती झाल्यानंतरच मुलाला दिल्यानंतर पैसे घेण्यात आले होते.
82 हजारांची रोकड जप्त
दरम्यान, ही संतापजनक घटना मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमधील आहे. जिथे महिलेला बाल वार्डात दाखल करण्यात आले होते. महिलेची रात्री उशिरा प्रसूती झाली, काही तासांनंतर नशेत असलेल्या बापाने मुलाला घेऊन एका जोडप्याच्या स्वाधीन केले. त्याबदल्यात एक लाख रूपयांची रक्कमही घेण्यात आली. पैसे घेताच नशा करणाऱ्याने बापाने काही पैसे खर्च केले, मात्र त्यानंतरच मेडिकल कॉलेजमध्ये मूल चोरीचा आरोप झाला. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली असता नशेत असलेल्या बापाचा खरा चेहरा समोर आला. तेव्हा त्याच्याकडून 82,000 रुपये जप्त करण्यात आले.
मुलाच्या आईनेही दिली कबुली
मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, ऑन डिमांड डील प्रसूती आधीच झाली होती. अटीनुसार, मुलगा झाला तर 1 लाख रूपये द्यावे लागतील. या व्यवहारात नशेत असलेल्या वडिलांसह चिमुकल्याच्या आईनेही सहमती दर्शवली. चिमुकल्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, सर्वकाही नियोजनानुसार झाले होते, मात्र मेडिकल कॉलेजमध्ये मूल चोरीला गेल्याचा आरोप झाल्यानंतर दोघांचाही पर्दाफाश झाला. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे, मात्र दोघांचेही एकमत आहे त्यामुळे या प्रकरणी फौजदारी कलमांतर्गत गुन्हा कसा नोंदवायचा, याबाबत पोलिसही संभ्रमात आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"