नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये निवडून आलेले किंवा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे पेव फुटले आहे. निवडणूक होत असलेल्या चार राज्यांमध्ये अशी उदाहरणे समोर आली आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस सोडून भाजपत गेलेले माजी मंत्री हरकसिंग रावत पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसने त्यांच्याऐवजी त्यांची सूून अनुकृती गोसैन रावत यांना लँडस् डाऊन या मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. गोवा हे आयाराम व गयारामसाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. मायकेल लोबो हे भाजपच्या मंत्रिमंडळात होते. ते अगदी निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे प्रसाद गांवकर हे आमदारही काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पंजाबमधून हरगोविंदपुरा मतदारसंघाचे भाजपचे आमदार बलविंदर सिंग लड्डा पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. या निवडणूक धुराळ्यात प्रसारमाध्यमांमध्ये फारसे लक्षवेधी नसलेले मणिपूर राज्यातही पक्षांतर सुरू आहे.
Uttarakhand Assembly Election 2022: काँग्रेस ते काँग्रेस व्हाया भाजप, अनेक नेत्यांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 9:51 AM