उत्तराखंड - निवडणूक आयोगाने 5 राज्यातील निवडणुकांची घोषणा केली असून उत्तराखंडमध्येही निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, निवडणुकांपूर्वीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री हरकसिंह रावत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. तसेच, भाजपमधून 6 वर्षांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता ते खुलेआम भाजपविरुद्ध बोलताना दिसत आहेत. मात्र, मंत्रीमंडळातून हकालपट्टी केल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियातील मनघडण वृत्तांतून माझ्याबाबत एवढा मोठा निर्णय घेतला. माझ्याशी कुठलाही संवाद न करताच त्यांनी हा निर्णय घेतला. ही विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचं रावत यांनी म्हटलं आहे. तसेच, मी जर काँग्रेस सोडून भाजपात आलो नसतो, तर 4 वर्षांपूर्वीच मी भाजपला रामराम केला असता. मला मंत्रीपदाचा कुठलाही शौक नाही, मी केवळ काम करू इच्छित होतो. मी आता काँग्रेस पक्षासोबत बोलणी करणार आहे. उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेसची सत्ता येईल, असे भाकितही हरकसिंह रावत यांनी केले आहे.
दरम्यान, आमचा पक्ष वंशवादापासून दूर असून विकासावर चालतो. आम्ही विकासाच्याबाबतीत त्यांनी जे म्हटलंय, ते सर्वकाही केल्याचं मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटलं.