उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:38 AM2024-11-04T11:38:38+5:302024-11-04T11:47:10+5:30

अल्मोडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

uttarakhand bus full of passengers fell into ditch in almora sdrf team left for rescue | उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. मार्चुला परिसरात प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये ४० हून अधिक लोक प्रवास करत होते. घटनेनंतर एसएसपी अल्मोडा घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यासाठी एसडीआरएफची तीन पथकं अपघातस्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. अल्मोडा एसपींनी अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

एसडीएम संजय कुमार यांनी सांगितलं की, काही लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अल्मोडा पोलीस ठाण्याच्या सॉल्ट मर्चुला परिसरात हा अपघात झाला. बस खोल दरीत कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 

आलोक कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गढवालहून कुमाऊंकडे जात असताना अल्मोडा येथील मर्कुलामध्ये हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

अल्मोडा एसपी देवेंद्र पिंचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू आहे, प्रशासन लोकांना वाचवण्यात व्यस्त आहे. या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्ट केली आहे. 

Web Title: uttarakhand bus full of passengers fell into ditch in almora sdrf team left for rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.