उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी हिमकडा कोसळून धौलीगंगा नदीला महापूर आला. त्यामुळे संपूर्ण जलविद्युत प्रकल्पच वाहून गेल्याची दुर्घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ही आपत्ती नेमकी कशामुळे ओढवली, नेमके काय घडले, जाणून घेऊ या...हिमकडे कोसळण्याचे प्रमाण...तापमानवाढीमुळे हिमकड्यांचा पाया ढासळत आहे. चमोलीसारख्या घटना त्याची साक्ष देतात. जवळपास ८० कोटी लोकसंख्या सिंचन, वीज आणि पाणी यांसाठी हिमालयातील हिमकड्यांवर अवलंबून आहे. मात्र, हिमकडे कोसळण्याचे प्रमाण तापमानवाढीमुळे वाढू लागली असून येत्या काही दशकांत हिमकडे नामशेष होतील, अशी शंका शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.आशियाई देशांत वाढते प्रमाणआशियाई देशांमध्ये जीवाश्म इंधन आणि बायोमास यांचा अतिवापर झाल्याने त्यातून निघणाऱ्या धुराचा सर्वाधिक परिणाम हिमकड्यांवर होत आहे. त्यामुळे त्यांच्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. १९७५ ते २००० या कालावधीत किरकोळ उष्णतेमुळे ०.२५ मीटर हिमकड्यांचे नुकसान झाले. २००० सालानंतर या प्रमाणात दुप्पट वेगाने वाढ झाली. दरवर्षी साधारणत: अर्धा मीटर बर्फ वितळू लागला. १९९१ साली उत्तर प्रदेश राज्याचा भाग असलेल्या उत्तर काशीमध्ये ६.८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यात ७६८ नागरिक ठार झाले, तर हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती. उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन २००० साली उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. उत्तराखंडमध्ये आता उत्तर काशी हा भाग आहे.४० वर्षे सॅटेलाइट इमेजेसचे विश्लेषण या अभ्यासासाठी भारत, चीन, नेपाळ आणि भूतान या देशांकडून ४० वर्षांचा सॅटेलाइट डेटा घेण्यात आला. त्यातील अभ्यासातून असे आढळून आले की, हिमालयातील हिमकडे वेगाने नष्ट होऊ लागले आहेत. जर्नल सायन्स ॲडव्हान्सेजमध्ये प्रकाशित अहवालानुसार २००० सालानंतर हिमकड्यांमधून दीड फूट उंचीचे बर्फ नष्ट होत आहे. बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. २५ टक्के भाग हिमकड्यांचा ४० वर्षांत नष्टकोलम्बिया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ४० वर्षांत हिमालयातील हिमकडे वेगाने वितळू लागले आहेत. हिमकड्यांचा तब्बल एक चतुर्थांश भाग वितळून गेला असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकी गुप्तचर उपग्रहांद्वारे विश्लेषणबर्फ वितळण्याची वेळ सर्व ठिकाणी एकसारखी आहे, यावर सर्व संशोधकांचे एकमत आहे. याचे कारण म्हणजे तापमानात झालेली वाढ. १९७५ ते २००० या कालावधीच्या तुलनेत २००० ते २०१६ या कालावधीत तापमानात १ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याची नोंद आहे. अभ्यासासाठी संशोधकांनी पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या २००० किमी लांबीच्या ६५० हिमकड्यांचा अभ्यास केला. त्यासाठी अमेरिकी गुप्तचर खात्याच्या उपग्रहांचा वापर केला गेला. ऋषीगंगा धरणाची वैशिष्ट्ये उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या जलप्रलयात वाहून गेलेला ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प त्या राज्यातील चामोली जिल्ह्यात आहे. या धरणाची उंची नदीच्या पात्राच्या उंचीपेक्षा २९ मीटरने अधिक होती. धाैलीगंगा नदीवर हे धरण बांधले जात होते. ऋषीगंगा प्रकल्पातून ६३ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट होते. गेल्या दहा वर्षांपासून त्याचे काम सुरू होते.उत्तराखंडला बसलेले नैसर्गिक आपत्तींचे तडाखे...२०१३ मध्ये केदारनाथाला आलेल्या जलप्रलयामुळे ५,६०० लोकांचा मृत्यूपिठोरागढ जिल्ह्यामध्ये १९९८ साली दरड कोसळून २५५ जण ठार झाले होते. त्यामध्ये कैलास मानसरोवरच्या ५५ यात्रेकरूंचा समावेश होता.केदारनाथमधील दुर्घटनेच्या आठ वषानंतर हिमकडा कोसळून धौलीगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्प वाहून गेलाहिमनदीच्या सरोवराला पूर कसा येतो?हिमनदीच्या सरोवराला पूर येणे म्हणजे असा उद्रेक की ज्यात पाण्याच्या प्रचंड प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणावर हिमनग, दगडगोटे आणि माती वाहून येते. तसेच हिमनदीच्या मार्गात असलेले धरण हे पाणी रोखण्यात अयशस्वी ठरल्यास असा उद्रेक होतो.चमोली जिल्ह्यामध्ये १९९९ साली ६.८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. या भूकंपातही मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. १०० जण ठार झाले होते.या भूकंपामुळे शेजारच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्येही मोठे नुकसान झाले होते, तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे नद्यांचा प्रवाह काही ठिकाणी बदलला होता, तसेच रस्त्यांनाही मोठ्या भेगा पडल्या होत्या.सर्वतोपरी मदत करणार : अमित शहाया भीषण दुर्घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घेतली आहे. केंद्र सरकार उत्तराखंडला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन शहा यांनी रावत यांना दिले आहे.तातडीने मदत करा : राहुल गांधीहिमकडा कोसळून झालेल्या महापुरामुळे उत्तराखंडमध्ये अतिशय दु:खद घटना घडली असून आपत्तीचा तडाखा बसलेल्या सर्वांना राज्य सरकारने तातडीने सर्व मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केेले. उत्तर प्रदेश सरकारही सरसावले मदतीसाठीघडलेल्या भीषण दुर्घटनेचा ज्यांना तडाखा बसला त्यांना उत्तर प्रदेश सरकार शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यामुळे उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या किना-यावरील गावांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी अधिका-यांना दिले आहेत.