उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठी दूर्घटना घडली आहे. येथे ग्लेशर कोसळल्याने धरण फुटल्याची (Dam Broken in Uttarakhand Joshimath) घटना घडली आहे. यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Uttarakhand Joshimath dam broken alert issued to Haridwar)कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका -रावत म्हणाले, टचमोली जिल्ह्यातून आपत्ती आल्याचे वृत्त समजते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापनाला या आपत्तीचा सामना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकार सर्वप्रकारची आवश्यक ती पावले उचलत आहे.’
सांगण्यात येते, की तपोवनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका नदीमुळे ही आपत्ती ओढवली आहे. ज्या नदीचा उल्लेख केला जात आहे, तिला धौली गंगा नावानेही ओळखले जाते. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही दुजोरा दिला आहे.
हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी -पोस्ट जोशीमठ येथील हेड कॉन्स्टेबल मंगल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वाजून 55 मिनिटांनी जोशीमठ पोलीस ठाण्यातून रैणी गावात हिमकडा कोसळल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऋषिगंगा पावर प्रोजेक्टचे मोठे नुकसान -उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोवन रैणी भागात हिमकडा कोसळल्याने ऋषिगंगा पावर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे अलकनंदा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहोचावे. चमोली पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नंबरदेखील जारी केला आहे. चमोली पोलिसांनी जारी हेल्पलाईन -व्हर्चुअल पोलीस स्टेशन जनपद चमोलीWhatsapp 9458322120,FaceBook chamoli police,Twitter @chamolipolice @SP_chamoli,Instagram chamoli_police