शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Uttarakhand Rain: नैनीताल जिल्ह्यात ढगफुटी, 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:46 AM

नैनीताल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नैनीतालचे रस्ते जलमय झाले आहेत. इमारती आणि घरांमध्येही पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

नैनीताल: मुसळधार पावसामुळे उत्तराखंड पुन्हा एकदा उध्वस्त झालंय. ठिकठिकाणी भूस्खलनामुळे किमान 6 जणांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासह, रामनगरमधील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ झाल्यामुळे, अनेक रिसॉर्ट्समध्ये पाणी भरलं आहे. दरम्यान, नैनीताल जिल्ह्यातील रामगढमध्ये ढगफुटी झाल्याची घटना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरूच आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव सांगतात की, नैनीताल आणि उधम सिंह नगरमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याला गती देण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर तैनात केले जातील. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर-रानीखेत रस्त्यावर असलेल्या लेमन ट्री रिसॉर्टमध्ये सुमारे 100 लोक अडकले आहेत, ते सर्वजण सध्या सुरक्षित आहेत. 

एसएसपी प्रीती प्रियदर्शिनी यांनी सांगितले की, नैनीताल जिल्ह्यातील रामगढ गावात ढगफुटी झालेल्या ठिकाणाहून काही जखमींना वाचवण्यात आलं आहे. ढिगाऱ्याकाळी दबलेल्या लोकांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. तर, तिकडे नैनीताल तलावही ओव्हरफ्लो झाल्यामुळे नैनीतालचे रस्ते जलमय झाले आहेत. इमारती आणि घरांमध्येही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. परिसरात सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

नैनीताल तलाव ओव्हरफ्लो

गंगेची पातळी धोक्याच्या चिन्हावर

गेल्या दोन दिवसांपासून डोंगरावर पडणाऱ्या पावसामुळे गंगा धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. गंगा 294 मीटरच्या धोक्याच्या चिन्हापासून 0.35 मीटर वर 294.35 मीटर वर वाहत आहे. गंगेच्या वाढत्या पातळीमुळे हरिद्वारमधील गंगेला लागून असलेल्या भागांना सतर्क करण्यात आले आहे.

आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्टहवामान विभागाने मंगळवारीदेखील राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. याशिवाय ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळ येण्याचीही शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय जिल्हा मुख्यालय सोडू नका असे आदेश देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊसfloodपूरlandslidesभूस्खलन