बोगद्यात अडकलेले 41 मजूर नेमके कधी बाहेर येणार?; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:30 AM2023-11-20T10:30:41+5:302023-11-20T10:54:50+5:30
Nitin Gadkari : अमेरिकेतून मागवण्यात आलेली ऑगर मशीन बोगद्यातील मलबा हटवण्याचं काम करत आहे.
उत्तरकाशीच्या बोगद्यात सुरू असलेलं बचावकार्य येत्या दोन ते अडीच दिवसांत पूर्ण होऊ शकते. यासाठी स्वित्झर्लंड, अमेरिका आदी देशांतील टनल एक्सपर्टचा सल्ला घेतला जात आहे. बचाव कार्यासाठी 6 प्रकारचे प्लॅन तयार केल्यानंतर आता पुन्हा एकदा खोदकाम सुरू करण्यात आले आहे. यासोबतच बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हलका आहार देण्याऐवजी आता भात-डाळ, चपाती, भाजी पाठवण्याचा विचार सुरू आहे.
पंतप्रधान मोदी स्वतः या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सूचनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी रविवारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव एस.एस.संधूही होते. नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "41 मजूर बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue Operation) गेल्या 8 दिवसांपासून अडकले आहेत. संपूर्ण देश त्याच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत."
सिलक्यारा टनल के अंदर फंसे मजदूरों की जान बचाकर उन्हें बाहर निकालना यह हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। pic.twitter.com/CyQNAiiYGp
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 19, 2023
"तज्ज्ञांसोबतच्या बैठकीत सहा रेस्क्यू प्लॅन तयार करण्यात आले आहेत, त्यावर काम सुरू करण्यात आलं आहे. अमेरिकेतून मागवण्यात आलेली ऑगर मशीन बोगद्यातील मलबा हटवण्याचं काम करत आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास दोन ते अडीच दिवसांत सर्व कामगारांना बाहेर काढलं जाईल." तसेच मुख्यमंत्र्यांनी "प्रत्येकाचा जीव वाचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आतमध्ये अडकलेल्या लोकांच्या समस्या वाढत आहेत याची मला जाणीव आहे, त्यामुळे आतील मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो" असं म्हटलं आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव रंजीत सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही ऑगर मशीनच्या मदतीने 900 मिमी व्यासाचा पाइप टाकत आहोत. आम्ही सध्या 22 मीटरपर्यंत पोहोचलो आहोत आणि वेगाने पुढे जात आहोत. आम्ही पाईपद्वारे अन्न आणि इतर आवश्यक वस्तू आत पाठवत आहोत. त्या पाईपच्या वर दुसरा पाईप टाकणार आहोत. आता आम्ही 42 मीटर पर्यंत गेलो आहोत आणि फक्त काही मीटर उरले आहेत. ते तयार झाल्यावर, आमच्याकडे लाईफ सपोर्टसाठी आणखी एक पाईप असेल."
#WATCH | Uttarkashi, Uttarakhand tunnel rescue | Disaster Management Secretary Ranjit Sinha says, "We are inserting a 900mm diameter pipe with the help of the Auger machine. We have reached 22 meters and we are going ahead rapidly. There is a lifeline pipe for sending food and… pic.twitter.com/ioSWaCrM9G
— ANI (@ANI) November 19, 2023