उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा बोगद्यात तब्बल 17 दिवसांनंतर अडकलेल्या सर्वच्या सर्व 41 मजुरांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मजुरांना मंगळवारी (29 नोव्हेंबर) रात्री बाहेर काढण्यात आले. हे सर्व मजूर वेग वेगळ्या राज्यातून येथे मजुरी करण्यासाठी आले होते. खरे तर घरातील गरिबीच्या परिस्थितीने या मुजारांना इथवर ओढत नेले आहे. मात्र जेव्हा ही दुर्घटना घडली, तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी उत्तरकाशीत पोहोचले, मात्र त्यांना इथपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड होते.
येथील चार धाम राष्ट्रीय महामार्ग प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यांतील मजूर येथे आले आहेत. सिल्क्यारा बोगदा देखील 1.5 अब्ज डॉलरच्या या प्रोजेक्टचाच भाग आहे. 12 नोव्हेंबरच्या सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यापासून या मजुरांचे कुटुंबीय चिंतित होते.
गरिबीच्या परिस्थितीनं खेचून नेलं -यांतील अनिल नावाचा एक मजूर झारखंडमधील रांचीजवळील आहे. अनिलचे कुटुंब येथे एका कच्च्या घरात राहते. त्याने त्याच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे केवळ 18,000 रुपयांसाठी हे काम निवडले होते. अनिलच्या आईने म्हटले आहे की, घरातील गरिबीने आपल्या मुलाला बोगद्यात काम करण्यासाठी गेऊन गेली. खरे तर या बोगद्यात अडकलेल्या सर्वच 41 मजुरांची काहीशी अशीच परिस्थिती आहे. नव्हे, या सर्वांची एकच जात आहे आणि ती म्हणजे, गरीबी. हीच गरिबी या मजुरांना उत्तरकाशीतील बोगद्यापर्यंत खेचून घेऊन गेली.
किती सॅलरी मिळायची -ही मजूर मंडळी केवळ 18,000 रुपयांसाठी सिल्क्यारा बोगद्यात काम करत होते. विशेष म्हणजे, या बोगद्यात काम करणे धोकादयाक आहे हे या मजुरांना माहित असतानाही ते येथे काम करत होते. कारण घरची गरिबीची आणि आलाखीची परिस्थिती. या परिस्थितीमुळे त्यांना इतर कुठला पर्यायच दिसला नाही.