उत्तरकाशी: गंगनानीजवळ भीषण अपघात, बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 07:49 PM2023-08-20T19:49:53+5:302023-08-20T19:50:36+5:30

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

Uttarakhand, Uttarkashi: accident near Gangnani, 7 devotees killed, many injured as bus fell into valley | उत्तरकाशी: गंगनानीजवळ भीषण अपघात, बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू अनेक जखमी

उत्तरकाशी: गंगनानीजवळ भीषण अपघात, बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू अनेक जखमी

googlenewsNext

उत्तरकाशी: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते, त्यापैकी किमान 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी गुजरातचे रहिवासी आहेत. यात्रेकरुंनी भरलेली ही बस गंगोत्रीहून प्रवास करुन परतत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने प्रवाशांना बाहेर काढले. 

या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 27 जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. अपघाताबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'गंगोत्री उत्तरकाशीकडून येणाऱ्या प्रवासी बस क्रमांक UK07PA-8585 चा गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानीजवळ अपघात झाला. गाडीत सुमारे 35 जण होते. 27 जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'

मुख्यमंत्र्यांनी अपघातावर शोक व्यक्त केला 
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या बस अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सीएम धामी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत लिहिले की, 'गंगनानीमध्ये गंगोत्रीहून उत्तरकाशीला जाणाऱ्या बसच्या अपघातात काही लोकांच्या मृत्यूची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. प्रशासनाला त्वरीत मदत आणि बचाव कार्य करण्याचे तसेच जखमींवर उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. सर्व जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.'

Web Title: Uttarakhand, Uttarkashi: accident near Gangnani, 7 devotees killed, many injured as bus fell into valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.