"मी शेवटी जाईन कारण..."; बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह यांनी जिंकली मनं, वाचवला मजुरांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 05:59 PM2023-11-29T17:59:59+5:302023-11-29T18:01:47+5:30
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अडकले होते. मंगळवारी सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं.
उत्तराखंडमधील बोगद्यातून 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. हे मजूर 17 दिवस बोगद्यात अडकले होते. त्यांच्या बचावकार्यात अनेक एजन्सी एकत्र काम करत होत्या. बोगद्यात अडकलेल्या मजुराचं मनोबल वाढविण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यांच्यासाठी लुडो आणि पत्ते पाठवले गेले. या मजुरांपैकी एक म्हणजे गब्बर सिंह नेगी आहेत.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांपैकी गब्बर सिंह नेगी यांनी सांगितलं की, "200 फूट जमिनीखाली 400 तासांपेक्षा जास्त काळ राहणं कठीण होतं. येथे इतर मजुरांना शांत ठेवणं आणि त्यांचं मनोधैर्य राखणं हे मोठं आव्हान होतं. मी माझ्या साथीदारांन योगा शिकवला आणि त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवलं. आपण सर्व सुखरूप बाहेर पडू. तुम्ही सर्व आधी बाहेर जा आणि मी नंतर बाहेर येईन असं सांगून त्यांना धीर दिला."
"सर्व कामगारांना सुरक्षित ठेवण्यात आले होते आणि वारंवार सांगत होतो की, मी तुमचा सिनियर आहे, त्यामुळे बोगद्यातून बाहेर पडणारा मी शेवटचा असेन."गब्बर सिंह यांच्यासह मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हे सर्वजण आता सुरक्षित आहेत. सर्व मजुरांचे कुटुंबीयही खूप आनंदी आहेत.
"हा चमत्कार..."; टनल एक्सपर्टनी बाबा बौखनागांचा घेतला आशीर्वाद, सांगितलं मिशनच्या यशाचं रहस्य
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अडकले होते. मंगळवारी सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं. 17 दिवस चाललेल्या या बचाव मोहिमेदरम्यान ऑस्ट्रेलियन टनल एक्सपर्ट अर्नाल्ड डिक्स चर्चेत होते. अर्नाल्ड डिक्स यांनी बोगद्याच्या सुरुवातीला असलेल्या मंदिरातील बाबा बौखनाग यांच्यासमोर प्रार्थना केली.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मिशनमध्ये एक चमत्कार घडला. अर्नाल्ड डिक्स हे स्थानिक देवता बाबा बौखनाग यांच्या मंदिरात प्रार्थना करताना दिसले. अर्नाल्ड डिक्स हे जिनेवामधील इंटरनॅशनल टनलिंग अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत आणि ते भूगर्भशास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि वकील देखील आहेत.