बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांची तब्येत कशी, डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 05:14 PM2023-11-29T17:14:13+5:302023-11-29T17:19:37+5:30
उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची १७ दिवसानंतर सुटका झाली.
उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची १७ दिवसानंतर सुटका झाली. या सर्व ४१ कामगारांवर ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. बोगद्याच्या अंधारात १७ दिवस घालवलेल्या कामगारांशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. याशिवाय सर्व मजुरांना १ लाख रुपये मदत म्हणून देण्यात आली आहे. या कामगारांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार याबाबत आता एम्स ऋषिकेशचे सहायक प्राध्यापक नरेश कुमार यांनी मोठी अपडेट दिली आहे.
नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नरेश कुमार म्हणाले, 'सर्व ४१ कर्मचाऱ्यांना आमच्याकडे आणण्यात आले आहे. यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यांच्यावर आता मानसोपचार आणि अंतर्गत औषध डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. सर्व कामगारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. कामगारांचे प्राथमिक मूल्यांकन डॉक्टरांच्या पथकाद्वारे केले जाईल. पुढचे २४ तास कामगारांना इथेच राहावे लागणार आहे.
डॉक्टरांनी दिलेली माहिती अशी, 'कर्मचारी कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाखाली असल्याचे दिसत नाहीत. तरीही, आमच्याकडे मनोचिकित्सक आणि अंतर्गत औषधांच्या डॉक्टरांची एक टीम आहे, जी त्यांची प्राथमिक तपासणी करतील. त्यानंतर, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे आणि डॉक्टरांना योग्य वाटणाऱ्या इतर गरजा पूर्ण केल्या जातील. हे सर्व केल्यानंतर, त्यांना डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवणार आहे.
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना 'रॅट होल मायनिंग' तंत्राच्या मदतीने पाईपद्वारे बाहेर काढण्यात आले. एनजीटीने हे तंत्र आधीच बेकायदेशीर घोषित केले आहे परंतु 'रॅट-होल' खाण कामगारांची कल्पकता आणि अनुभव सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्यात वापरण्यात आला.