"आम्ही 41 मजुरांना सुखरूप घरी परत आणू"; रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान टनल एक्सपर्टचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:00 PM2023-11-18T17:00:46+5:302023-11-18T17:01:38+5:30

उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज सातवा दिवस आहे.

uttarkashi tunnel expert arnold dix amid rescue operation we will bring laborers back home safely | "आम्ही 41 मजुरांना सुखरूप घरी परत आणू"; रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान टनल एक्सपर्टचा निर्धार

"आम्ही 41 मजुरांना सुखरूप घरी परत आणू"; रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान टनल एक्सपर्टचा निर्धार

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज सातवा दिवस आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी इंटरनॅशनल टनल एक्सपर्ट प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ऑनसाइट टीमला मदत करण्यासाठी ते भारतात येत आहेत. तज्ज्ञांनी अडकलेल्या मजुरांना सोडवण्याच्या योजनेबाबत चर्चा केली आहे. 

टनल एक्सपर्ट प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स म्हणाले की, "मी आता भारतात जात आहे आणि माझं मिशन स्पष्ट आहे. बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल. मी नुकताच ऑनसाइट टीमशी बोललो आहे. या लोकांच्या सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आम्ही सध्या आमच्या पर्यायांवर चर्चा करत आहोत. हे सर्वात कठीण क्षेत्र आहे. आम्ही त्या 41 लोकांना सुखरूप घरी परत आणू."

डोंगराच्या माथ्यावरून बोगद्यात 100 फुटांपर्यंत व्हर्टिकल ड्रिल केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ही कारवाई पूर्ण होण्यास आणखी एक आठवडा लागू शकतो. मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीने हाताने खोदलेल्या बोगद्यांचा पर्यायही स्वीकारता येईल, असंही ते म्हणाले. तसेच उच्च-तंत्रज्ञान पद्धती वापरण्याचा विचार तज्ज्ञ करत आहेत.

उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शनिवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. ड्रिलिंगचं काम सध्या ठप्प असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. NHIDCL ने शुक्रवारी रात्री उशीरा जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास पाचव्या पाईपच्या फिटिंग दरम्यान बोगद्यात मोठा आवाज ऐकू आला, त्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आले. आतापर्यंत बचाव पथकाला कोसळलेल्या बोगद्यातून 24 मीटरचा ढिगारा बाहेर काढण्यात यश आलं आहे.
 

Web Title: uttarkashi tunnel expert arnold dix amid rescue operation we will bring laborers back home safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.