17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर काढलेले 41 मजूर कधी घरी जाणार?; ऋषिकेश एम्सने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:30 PM2023-11-30T12:30:31+5:302023-11-30T12:37:02+5:30
बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 41 जणांची एम्स ऋषिकेश येथे आरोग्य तपासणी करण्यात आली येत आहे.
उत्तरकाशीतील बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 41 जणांची एम्स ऋषिकेश येथे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 17 दिवसांनी मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यावर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना आज घरी पाठवलं जाऊ शकतं. सर्व मजुरांची प्रकृती सामान्य असून त्यांची प्राथमिक तपासणी नुकतीच झाली असल्याचं रुग्णालयाने सांगितलं.
एम्स-ऋषिकेशचे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रोफेसर मीनू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांची प्रकृती नीट आहे. मी त्यांना पेशंट म्हणणार नाही. ते अगदी सामान्य वाटतात, ते अगदी सामान्य वागतात. त्याचं बीपी, ऑक्सिजनेशन - सर्व काही सामान्य आहे. त्याचे इलेक्ट्रोलाइट्स आणि पॅरामीटर पाहण्यासाठी आम्ही काही चाचण्या केल्या आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि आम्ही त्यांचा ईसीजीही करू.
डॉ. सिंह म्हणाले, या अगदी प्राथमिक तपासण्या आहेत, ज्या आम्हाला करायच्या आहेत. या घटनेचा त्याच्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो की नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्राथमिक मानसिक मूल्यांकन देखील करू. यासोबतच ते आजारी नसून त्यांना आपल्या घरी पाठवण्याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक यंत्रणांनी सुमारे 17 दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर मंगळवारी बोगद्यातून 41 मजुरांना सुखरुप बाहेर काढलं. काही काळ जवळच्या आरोग्य केंद्रात ठेवल्यानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी एम्स ऋषिकेश येथे आणण्यात आलं होतं.