अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:21 PM2023-11-29T16:21:50+5:302023-11-29T16:22:47+5:30

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे...

Uttarkashi Tunnel Story: Uttarkashi Tunnel Rescue: How did you take a bath, where did you go to the toilet? Workers told 'those' 17-day routine | अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

Uttarkashi Tunnel Story:उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिल्क्यरा बोगदा बचाव मोहिमेत विविध प्रकारचे अडथळे समोर आले, पण बचाव पथकाने ही आव्हाने दूर केली आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना चिन्यालीसौर येथील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व कामगारांची प्रकृती ठीक आहे. हे सर्व कामगार 17 दिवस बोगद्यात काय करत होते, त्यांची दैनंदिन दिनचर्या काय होती, ते काय खायचे, शौच्छास कुठे जायचे, अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात असतील. याबद्दल आपण जाणून घेऊ...

दुसरे आयुष्य मिळाले

एखादा व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ आहे, कधीही त्याचा श्वास थांबू शकतो, अशावेळी त्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत हे कामगार मृत्यूशी झूंज देत होते. जगण्याची तीव्र इच्छा आणि कोणीतरी आपल्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या विश्वासानेच कामगार जगू शकले. झारखंडचे रहिवासी चमरा ओराव सांगतात की, मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ते फोनवर लुडो खेळायचे, बोगद्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्यात आंघोळ करायचे. 28 नोव्हेंबर रोजी बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अशी होती तीनचर्या
ओराव सांगतात की, 12 नोव्हेंबर रोजी ते बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज आला आणि अचानक माती कोसळू लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ढिगाऱ्यांमुळे तिथेच अडकले. बऱ्याच वेळापासून अडकलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर सर्व कामगारांची अस्वस्थता वाढली. कुणाकडेच खाण्यापिण्याला काही नव्हते. ते फक्त देवाकडे जीव वाचण्यासाठी प्रार्थना करू शकत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकाही कामगाराने जगण्याची आशा सोडली नाही. 

सुमारे 24 तासांनंतर, म्हणजेच 13 नोव्हेंबरला, कामगारांना पाईपद्वारे भात पाठवला गेला. जेवण मिळाल्यावर कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्री पटली आणि आमच्या अंगात आनंदाची लाट उसळली. त्यावेळी खात्री पटली की, आता आपला जीव वाचू शकतो. दिवसभर टाईमपास करणं खूप अवघड जात होतं. ज्यांच्याकडे मोबाईल फोन होता, त्यावर लुडो खेळू लागलो. नेटवर्क नसल्याने कुणाशीही बोलता येत नव्हते. आम्ही एकमेकांशी बोलून आमच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करायचो. आंघोळीसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता आणि शौचासाठी जागा बनवली होती. झारखंडचे रहिवासी विजय होरो सांगतात की, आता ते त्यांच्या राज्याबाहेर कुठेही कामासाठी जाणार नाहीत. झारखंडमध्येच मिळेल ती नोकरी करणार. बाहेर राज्यात जाण्याची गरज भासली, तर धोकादायक कामे करणार नाही. 

Web Title: Uttarkashi Tunnel Story: Uttarkashi Tunnel Rescue: How did you take a bath, where did you go to the toilet? Workers told 'those' 17-day routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.