उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला, 50-60 मजूर अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 11:26 AM2023-11-12T11:26:30+5:302023-11-12T11:30:53+5:30
उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. घटनेची मााहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. घटनेची मााहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 50-60 मजूर अडकल्याची माहिती समोर येत आहे. या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते.
या वर्षी ऑगस्टमध्ये, शिवपुरी भागातील पुराच्या प्रवाहाच्या पाण्याने भरलेल्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाईन प्रकल्पाच्या 'एडिट-II' नावाच्या बोगद्यात सुमारे 114 कामगार अडकले होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाणी बाहेर काढले आणि दोरीच्या सहाय्याने सर्व 114 कामगारांची सुटका केली होती.
Part of the tunnel under construction broke in #Uttarkashi, Uttarakhand, A Large number of workers being trapped. #SDRF and police teams along with the district administration reached the spot for rescue.#Tunnel#Uttarakhandpic.twitter.com/jAHTGd6tbP
— Himanshu dixit (@HimanshuDixitt) November 12, 2023