नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तान उच्चायुक्तालयात राष्ट्रीय दिवस समारंभात सहभाही झाल्यानंतर आपल्या टिष्ट्वटमुळे उद्भवलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राजीनामा सादर केल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावत भाजप आणि सरकार यांच्याप्रती आपण बांधील असल्याची ग्वाही दिली.आपल्या टिष्ट्वटवरून प्रसारमाध्यमांनी राईचा पर्वत केल्याचा आरोप करत सिंह यांनी काही लोक अनावश्यक वाद निर्माण करत असल्याचा दावा केला. सिंह यांनी रात्री उशिरा आपल्या निवासस्थानासमोर वाचलेल्या निवेदनात म्हटले की, सरकारच्या बांधीलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लोकांकडे माझ्या टिष्ट्वटमध्ये अंगुलीनिर्देश करण्यात आले होते. माझा पक्ष, सरकार आणि विशेषत: आपल्या पंतप्रधानांप्रती मी पुर्णत: बांधील आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या कार्यक्रमात काश्मीरी फुटीरतावादी सहभागी होणे ही काही नवी बाब नसल्याचा दावा करत ते दरवर्षी सामील सहभागी होतात, असे सिंह म्हणाले.तत्पुर्वी, विदेश राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी अपरिहार्यता म्हणून सोमवारी पाक उच्चायुक्तालयात पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारी टिष्ट्वट मालिका जारी केल्यानंतर वाद उफाळला असून काँग्रेससह विविध पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सिंग यांना पाकिस्तानच्या कार्यक्रमाला जावे लागल्याबद्दल एवढा पश्चाताप होत असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे काँग्रेसने स्पष्ट केले.या वादानंतर मला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे सिंग यांनी नमूद केले. पाकिस्तानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजर व्हावे लागल्याबद्दल टिष्ट्वट जारी करताना सिंग यांनी ‘नाराजी’ आणि ‘कर्तव्य’सारख्या शब्दांचा वापर केला होता. काश्मिरी विघटनवाद्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला सिंग यांनी नावालाच हजेरी लावण्याचे कर्तव्य बजावले होते. मोदी सरकारने त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविल्याने त्यांनी कर्तव्य म्हणून तसे करावे लागल्याचा संदर्भ टिष्ट्वटमध्ये दिला होता. या कार्यक्रमानंतर तासाभरातच त्यांनी टिष्ट्वट मालिका जारी करीत ‘ड्युटी’ आणि ‘डिसगस्ट’ अशा शब्दांचा वापर करीत नाराजी दर्शविली होती. काही वृत्तपत्रांनी माझ्या टिष्ट्वटचा विपर्यास केल्याचे सांगत सिंग यांनी मीडियाला जबाबदार धरले आहे. मला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. सरकारच्या आदेशावरून मी या कार्यक्रमाला हजर झालो होतो. मीडियाने या मुद्यावर आकांडतांडव का चालविला आहे? असा सवालही सिंग यांनी केला. च्सिंग यांनी मंत्री असल्यामुळे पाकिस्तानच्या कार्यक्रमाला हजर व्हावे लागले असे सांगताना विवशताच व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला जाण्याची बाध्यता किंवा अपरिहार्यता ते सांगत आहेत. याचा अर्थ पाकिस्तानबाबत सरकारचा दुटप्पीपणाच स्पष्ट होतो. त्यांना असहज वाटत असेल तर राजीनामा द्यावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी ट्टिटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले.
व्ही. के. सिंग यांचे राजीनामा न-नाट्य
By admin | Published: March 25, 2015 1:44 AM