शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

व्ही. के. सिंग यांचा पुन्हा ‘टिष्ट्वट’वाद

By admin | Published: April 09, 2015 12:48 AM

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली आहे.

नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली आहे. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या प्रेस्टिट्यूटकडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे. अलीकडच्या काळात व्ही. के. सिंग व वाद हे समीकरणच झाले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान दिनानिमित्त पाक दूतावासात झालेल्या समारंभाला सिंग उपस्थित होते. त्यानंतर नाइलाजास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले असे टिष्ट्वट त्यांनी केले. त्यांच्या या टिष्ट्वटवरून मोठे वादळ निर्माण झाले होते. त्यांच्या या टिष्ट्वटची माध्यमांमध्येही खरपूस चर्चा झाली. हे वादळ शमत नाही तोच माजी लष्करप्रमुख असलेले सिंग यांनी आणखी एक वाद उभा केला.सध्या ते युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेत व्यग्र आहेत. त्यासाठी ते जिबोती येथे तळ ठोकून आहेत. यावेळी झालेल्या पत्रपरिषदेत त्यांनी पाक दूतावासातील कार्यक्रम व येमेन मोहिमेची फारच विचित्र तुलना केली. दूतावासाच्या भेटीसारखा थरार येमेन मोहिमेत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली. सिंग यांना ती फारच झोंबली व त्यांनी पुन्हा एकदा टिष्ट्वटरवरून माध्यमांवर हल्ला चढविला आणि माध्यमांना चक्क ‘प्रेस्टिट्यूट’ संबोधून अपमान केला. वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकणारे सिंग माध्यमांवर जाम नाराज आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)