एस. के. गुप्ता नवी दिल्ली : येत्या फेब्रुवारी महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेस सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य खात्याने कोविन अॅपही तयार केले आहे. लसीच्या वितरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी चर्चा करणार आहेत.
देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नरेंद्र मोदी मंगळवारी स्वतंत्रपणे चर्चा करतील. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत लसीच्या वितरणाबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान माेदी संवाद साधतील.
फायझर, मॉडेर्नापेक्षा स्पुटनिक व्ही स्वस्तnरशियाच्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत मॉडेर्ना, फायझर कंपनीच्या लसींपेक्षा खूपच कमी असेल असे त्या देशाने म्हटले आहे. nमॉडेर्ना लसीची किंमत २५ ते ३७ डॉलरच्या दरम्यान तर फायझर कंपनीची कोरोना लस १९.५० डॉलरला मिळेल. nस्पुटनिक व्ही या लसीची किंमत त्यापेक्षा कमी असणार आहे. अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला ११ किंवा १२ डिसेंबरपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे.
विविध कंपन्या ही लस विकसित करत आहेत. मात्र आॅक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनी विकसित करत असलेल्या कोविशिल्ड या लसीवर भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांचा अधिक भरवसा आहे. nकोविशिल्ड लस फेब्रुवारीत तर भारत बायोटेक बनवत असलेली कोवॅक्सिन ही लस एप्रिलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.nअॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड लस ७० ते ९० टक्के परिणामकारक असून ती रेफ्रिजेटरमध्ये ठेवता येईल. तिच्या साठ्यासाठी फ्रीझरची गरज नाही ही भारतासाठी सुवार्ताच आहे. nकोविशिल्ड लसीची साठवणूक २ ते ८ अंश सेल्सियस तापमानामध्ये करता येते. त्याउलट फायझर, मॉडेर्ना यांच्या कोरोना लसी शून्यापेक्षा कमी तापमानामध्ये ठेवणे अनिवार्य आहे.
७०-९०%
परिणामकारक कोविशिल्ड लस