ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हरियाणातल्या कंपनीसाठी घेतलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराचं प्रकरण वाड्रा यांना भोवण्याची शक्यता आहे. या जमीन गैरव्यवहाराचा अहवाल न्यायाधीश एस. एन. धिंग्रा समितीनं हरियाणा सरकारला सादर केला आहे. त्यामुळे हरियाणा सरकारच्या भूमिकेवर आता वाड्रा यांचं भवितव्य अवलंबून आहे.
याआधी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीनं वाड्रा यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षानं वाड्रा यांच्या भ्रष्टाचारात प्रकरणांवर आवाज उठवला असून, अनेक आरोप केले होते. हरियाणातल्या खट्टर सरकारला 182 पानांचा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. न्यायाधीश धिंग्रा यांनी हरिणायातील वाड्रा यांनी खरेदी केलेल्या जमीन गैरव्यवहारात अनियमितता झाल्याचे सूतोवाच केले आहेत.
धिंग्रा यांनी यावेळी अहवाल दोन भागांमध्ये विभागण्यात आल्याची माहिती दिली आहे. एक भागमध्ये चौकशीनंतरच्या अनियमिततेचा तपशील आहे. तर दुस-या भागात या नियमिततेच्या गैरव्यवहाराचे पुरावे आहेत, असंही यावेळी न्यायाधीन एस. एन धिंग्रा यांनी सांगितलं आहे.