नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘सदैव अटल’ हे स्मारक मंगळवारी राष्टÑाला समर्पित करण्यात आले. वाजपेयींच्या जयंतीनिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद, उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली.वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजारानंतर १६ आॅगस्ट रोजी निधन झाले. १७ आॅगस्ट रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या कमळाच्या आकाराच्या स्मारकावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, वाजपेयींचे कुटुंबीय व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आदरांजली वाहिली.यावेळी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १.५ एकर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले असून, त्यासाठी १०.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आलाआहे.
वाजपेयींचे स्मारक राष्ट्राला समर्पित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:08 AM