लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:58 AM2023-06-24T06:58:28+5:302023-06-24T06:59:35+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

Vajramuth for the Lok Sabha, the opposition will come together in the battlefield; Decision at the meeting in Patna | लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार

लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार

googlenewsNext

पाटणा : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी पाटण्यातील बैठकीत घेतला. तथापि, नियाेजनाबबत पुढील महिन्यात शिमला येथे आगामी नियाेजनाबाबत सल्लामसलत करण्याचेही यावेळी ठरले. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल,  हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह १७ पक्षांचे जवळपास ३२ प्रतिनिधी हजर होते.

वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चाल
आम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 
वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

मोदींविरोधात कोण? 
२०२४ मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे.  जेपी आंदोलनाप्रमाणेच आमच्या संयुक्त आघाडीलाही जनतेचा आशीर्वाद मिळेल. 
    - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी  

देशाच्या अखंडतेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशात हुकूमशाही आणणाऱ्यांना आम्ही विरोध करु. सुरुवात चांगली असेल, तर भविष्यात सर्वकाही चांगले होईल.    - उद्धव ठाकरे 

Web Title: Vajramuth for the Lok Sabha, the opposition will come together in the battlefield; Decision at the meeting in Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.