शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 6:58 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

पाटणा : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी पाटण्यातील बैठकीत घेतला. तथापि, नियाेजनाबबत पुढील महिन्यात शिमला येथे आगामी नियाेजनाबाबत सल्लामसलत करण्याचेही यावेळी ठरले. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल,  हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह १७ पक्षांचे जवळपास ३२ प्रतिनिधी हजर होते.

वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चालआम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

मोदींविरोधात कोण? २०२४ मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे.  जेपी आंदोलनाप्रमाणेच आमच्या संयुक्त आघाडीलाही जनतेचा आशीर्वाद मिळेल.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी  

देशाच्या अखंडतेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशात हुकूमशाही आणणाऱ्यांना आम्ही विरोध करु. सुरुवात चांगली असेल, तर भविष्यात सर्वकाही चांगले होईल.    - उद्धव ठाकरे 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे