शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

प्रेरणादायी! कुटुंबीयांचा शिक्षणाला विरोध, घरी राहून केली UPSC ची तयारी; झाली IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 3:58 PM

वंदना सिंह चौहान यांना शिक्षणासाठी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले. मनात काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग मिळतोच हे आयएएस अधिकारी वंदना यांनी सिद्ध केलं आहे. 

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. घरच्यांनी शिक्षणाला विरोध केला पण ती घाबरली नाही तर जिद्दीने अभ्यास करून मोठी अधिकारी झाली आहे. आजही अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे मुलींच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. वंदना सिंह चौहान यांना शिक्षणासाठी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले. मनात काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग मिळतोच हे आयएएस अधिकारी वंदना यांनी सिद्ध केलं आहे. 

वंदना सिंह चौहान यांचा जन्म 4 एप्रिल 1989 रोजी हरियाणातील नसरुल्लागड गावात झाला. त्यांचे वडील महिपाल सिंह चौहान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या गावात चांगली शाळा नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. तेव्हा वंदना त्यांना सतत एकच प्रश्न विचारायच्या की तिला अभ्यासासाठी बाहेर कधी पाठवणार? सुरुवातीला त्यांनी वंदना यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिलं नाही.

एके दिवशी वंदना यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की, ती मुलगी आहे आणि त्यामुळे तिचे वडील तिला बाहेर पाठवत नाहीत. यानंतर त्यांनी वंदना यांना मुरादाबाद येथील गुरुकुलमध्ये पाठवलं. त्यानंतर वंदना यांचे आजोबा, काका आणि कुटुंबातील इतर सदस्य महिपाल सिंह यांच्या विरोधात गेले. बारावीनंतर वंदना यांनी कायद्याच्या अभ्यासासोबत घरीच राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. आयएएस अधिकारी होण्याच्या त्यांच्या ध्येयाबाबत त्या अत्यंत ठाम होत्या. 

वंदना सिंह दररोज 12-14 तास अभ्यास करायच्या. वंदना यांनी आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठात एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता, परंतु कुटुंबाचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावं लागलं. याच दरम्यान त्यांच्या भावाने त्यांना खूप साथ दिली. वंदना सिंह चौहान यांनी 2012 मध्ये हिंदी माध्यमातून UPSC परीक्षा देऊन 8 वी रँक मिळवली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी