Vande Bharat : देशातील रेल्वेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. आता भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 'वंदे भारत'चाही समावेश करण्यात आला आहे. वंदे भारतमध्ये जोरदार बुकिंग सुरू आहे. ही ट्रेन सेमी हायस्पीड ट्रेन आहे. वंदे भारत सध्या देशातील अनेक मार्गांवर धावत असून इतर अनेक मार्गांवरही ते धावण्याची तयारी सुरू आहे. या ट्रेनसाठी डबे तयार करण्याची ऑर्डर TATA समुहाला देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता टाटा समुहाने स्पष्टीकरण दिला आहे.
काही दिवसापासून, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या संदर्भात दावा करण्यात आला आहे. 'टाटा स्टीलला वंदे भारत रेलसाठी डबे तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आता कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही बातमी खोटी आणि निराधार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आम्हाला डब्यांच्या निर्मितीची ऑर्डर मिळालेली नाही. टाटा स्टीलने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या आसन आणि आतील पॅनल्सची ऑर्डर दिली आहे. हा त्यांच्या कोच किंवा डब्यांच्या निर्मितीसाठीचा आदेश नाही.
वडिलांचं निधन, दहावी नापास, लेकाच्या दुधासाठी पैसे नव्हते; आता आहे 800 कोटींचा मालक
या संदर्भात टाटा स्टीलचे देवाशिष भट्टाचार्य यांनी स्पष्टीकरण दिले. “टाटा स्टील वंदे भारत ट्रेनच्या २३ डब्यांसाठी २२५ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर लाइटवेट सीट आणि फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर कंपोझिट-आधारित अंतर्गत पॅनेलसाठी देण्यात आली आहे. संपूर्ण करार प्रक्रियेनंतर टाटा स्टीलला हा आदेश मिळाला आहे. ही ऑर्डर २२५ कोटी रुपयांची होती,असंही त्यांनी म्हटले आहे.
टाटा स्टीलच्या कंपोझिट डिव्हिजनने वंदे भारत एक्स्प्रेससाठी सीटिंग सिस्टीमसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्यानंतर काम सुरू केले आहे, यामध्ये प्रत्येक ट्रेनच्या सेटमध्ये १६ डब्यांसह २२ ट्रेन सेटसाठी पूर्ण सीटिंग सिस्टमचा पुरवठा समाविष्ट आहे.
टाटा स्टील सातत्याने रेल्वेमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत आहे. रेल्वेशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरमध्ये टाटा स्टीललाही काम मिळाले आहे. टाटा स्टीलने आराधना लाहिरी, डेप्युटी जीएम, टाटा मोटर्स यांची टाटा स्टीलमध्ये नवीन मटेरियल बिझनेस म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यामुळे रेल्वेशी व्यवसाय समन्वय निर्माण केला जाईल.